विधानसभेसाठी मोदींची महाराष्ट्रातील शेवटची सभा मुंबईत संपन्न, उद्धव ठाकरेंना दिलं चॅलेंज

On
विधानसभेसाठी मोदींची महाराष्ट्रातील शेवटची सभा मुंबईत संपन्न, उद्धव ठाकरेंना दिलं चॅलेंज

;Maharashtra Assembly Election 2024 :  महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक प्रचारातील आजची माझी शेवटची सभा आहे, मी संपूर्ण राज्याचा दौरा केला आहे, आज मी आमच्या मुंबईत आलो आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद महायुतीसोबत आहे. आज एकच आवाज आहे, भाजप महायुती आहे तर गती आहे, तरच महाराष्ट्राची प्रगती आहे, असे म्हणत मोदींनी महायुती सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती दिली.

दरम्यान, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरुन बोलताना त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत काँग्रेस व उद्धव ठाकरेंना टोला लगावला. 

नरेंद्र मोदींनी राज्यातील 8 विधानसभा मतदारसंघात सभा घेतली, या ठिकाणी भाषण करताना कलम 370, शेतकऱ्यांचे उत्पन्न, जातीवाद, दहशतवाद या मुद्द्यांवर भाष्य करताना काँग्रेसला लक्ष्य केले. विशेष म्हणजे आपल्या भाषणातून त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर व्यक्तिगत टीका टाळल्याचं दिसून आलं. मात्र, मुंबईतील शिवाजी पार्कवर भाषण करताना मोदींनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली.

मुंबईचा स्वभाव इमानदारी आणि मेहनत आहे. मात्र, काँग्रेसचा स्वभाव हा भ्रष्टाचार, अडथळे आणणे असा आहे. त्यामुळेच ते अटल सेतू व मेट्रोचा विरोध हे करत होते, डिजिटल इंडिया आणि युपीआयचं बोलत होतो तेव्हा मजाक उडवत होते. ही लोकं मुंबईला पुढे घेऊन जाऊ शकत नाहीत,

आम्ही जोडायला पुढे येतो. मात्र, मविआ तोडायची भाषा करते, मुंबईत अनेक भाषांची लोकं येतात, मात्र मविआ भांडणं लावते. काँग्रेस सरकार बनवण्यासाठी तडफडत आहे, एससी, एसटी, ओबीसी यांच्यात भांडणं लावत आहेत. आरक्षण देखील ही लोकं तुमचं घेऊन टाकतील, त्यामुळे एक है तो सेफ है.. असा नारा मोदींनी मुंबईतून दिला.  

बाळासाहेब ठाकरेंच नाव घेऊन उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई हे दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताचे, स्वाभिमानाचे शहर आहे. मात्र, एक पक्ष मविआत आहे, ज्याने कांग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिला आहे, असे म्हणत मोदींनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच, काँग्रेसच्या शहजादाकडून बाळासाहेबांचे गौरवउद्गार काढायला सांगा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असं म्हणायला लावा, असं चॅलेंजही मोदींनी उद्धव ठाकरेंना दिलं. 

महाविकास आघाडीवरही टीका

सावरकरांना शिव्या देणाऱ्यांच्या गळ्यात गळे टाकत फिरत आहेत, महाराष्ट्रातून नवी चिंतनची नवी धारा निघाली आहे, संतांनी दिशा दाखवली, छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प घेतला. देशभक्ती टिळकांनी दाखवली, दुसरीकडे एक विचार मविआचा देखील आहे, जो राज्याच्या विचाराला अपमानित करत आहे. हे सगळे तुष्टीकरणाला बळी पडले आहेत, मतांसाठी भगवा दहशतवाद बोलतात, सावरकरांचा अपमान करतात, काश्मीरमध्ये 370 साठीचा नवा प्रस्ताव समोर ठेवतात, असे म्हणत मोदींनी महाविकास आघाडीवर व काँग्रेसवर टीका केली.  

महाराष्ट्रात कुठे कुठे झाल्या सभा...!

धुळे
नाशिक
चिमूर
सोलापूर
पुणे
छत्रपती संभाजीनगर
पनवेल
मुंबई
नांदेड
अकोला

Advertisement

Latest News

दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी  दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
मंदिरा बेदी हे नाव मनोरंजन जगतात खूप प्रसिद्ध आहे. शांती या दूरदर्शनवरील मालिकेपासून सुरुवात केलेल्या मंदिरा बेदीने क्रिकेट समालोचक म्हणून...
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप 
कोणत्याही स्थितीत गद्दारांना गाडणार; सत्ताधाऱ्यांनी सरकारची तिजोरी लुटली; ठाकरेंची तोफ धडाडली
माझ्या जागेवर दुसरी आणली, हर्षवर्धन जाधवांवर आरोप करत संजना जाधव भर सभेत रडल्या
भारत लोकशाहीची जननी; नायजेरिया भेटीत पीएम मोदींचे प्रतिपादन 
पुष्पा-2 ट्रेलर रिलीज : अल्लू अर्जून पहिल्या भागापेक्षा डेंजर भूमिकेत दिसला