साऊथ फिल्म इंड्रस्टीतील हिरो-हिरोईन आमनेसामने; नयनतारा धनुषवर भडकली

10 कोटींची लिगल नोटीस अन् दोघांमध्ये चढला वाद, वाचा नेमकं काय घडलंय? 

On
साऊथ फिल्म इंड्रस्टीतील हिरो-हिरोईन आमनेसामने; नयनतारा धनुषवर भडकली

Nayantara vs Dhanush Documentary Controversy : साऊथ फिल्म इंडस्ट्रीची अभिनेत्री नयनताराने अभिनेता धनुषवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. वास्तविक, हे संपूर्ण प्रकरण नयनताराच्या जीवनावर आधारित 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल' या माहितीपटाशी संबंधित आहे.

धनुषने या माहितीपटातील 3 सेकंदाच्या व्हिज्युअलवर आक्षेप घेत अभिनेत्रीला 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यावर आता धनुष अन् नयनतारा यांच्यात जोरदार वाद चढला आहे. नेमकं काय प्रकरण आहे, चला जाणून घेऊया. 

RCC New

RCC New

नयनतारा काय म्हणाली पत्रात? 

नयनताराने आपल्या खुल्या पत्रात लिहिले आहे की, 'तुझे वडील आणि भावामुळे तू एक यशस्वी अभिनेता झालास, पण चित्रपटसृष्टीत माझा कोणी गॉडफादर नव्हता, त्यामुळे मला संघर्ष करावा लागला आणि आज मी माझ्यामुळेच चित्रपटसृष्टीत उभी आहे. माझ्या चाहत्यांना माझे काम माहिती आहे आणि ते माझ्या माहितीपटाची वाट पाहत आहेत, परंतु तुमच्या वृत्तीमुळे आमच्या कामावर मोठा प्रभाव पडला आहे. 
पण याचे परिणाम तुम्हालाही भोगावे लागतील. तुम्ही दोन वर्षे NOC ची वाट पाहत राहिलात आणि माझी डॉक्युमेंटरी पासही केली नाही, त्यामुळे आम्ही ते पुन्हा एडिट करू, ज्या 3 सेकंदाच्या व्हिज्युअलसाठी तुम्ही 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे, त्याचा निर्णय आता कोर्टात होईल आणि तुमचे कायदेशीर नोटीसला कायदेशीर पद्धतीने उत्तर दिले जाईल. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नयनताराने तिच्या 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल' या माहितीपटासाठी धनुषकडून त्याच्या 'ननुम राउडी धन' चित्रपटातील गाणी आणि दृश्यांसाठी परवानगी मागितली होती. पण धनुषने त्यांना परवानगी देण्यास नकार दिला आणि त्यानंतर डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर पाहिल्यानंतर अवघ्या 3 सेकंदांच्या व्हिज्युअल चोरीच्या आरोपाखाली अभिनेत्रीला 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली. नयनतारा स्वतः ननुम राउडी धन या चित्रपटात मुख्य अभिनेत्री होती.

  

Tags:

Advertisement

Latest News

राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
uresh Padvi join BJP : एकीकडे  विनोद तावडे यांनी  मतदारांना पैसे वाटले असा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. विरारमध्ये थरार...
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप 
कोणत्याही स्थितीत गद्दारांना गाडणार; सत्ताधाऱ्यांनी सरकारची तिजोरी लुटली; ठाकरेंची तोफ धडाडली
माझ्या जागेवर दुसरी आणली, हर्षवर्धन जाधवांवर आरोप करत संजना जाधव भर सभेत रडल्या