निवडणुकांच्या प्रचाराला सुरूवात होताच महायुतीतील बेबनाव आला समोर

शिंदेंचे आमदार थोरवे यांनी 'सुनील तटकरे म्हणजे महायुतीतील कॅन्सर' असे संबोधले

On
निवडणुकांच्या प्रचाराला सुरूवात होताच महायुतीतील बेबनाव आला समोर

Maharashtra Assembly Election 2024 : रायगड जिल्ह्यात महायुतीत काही आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. तर तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर आहे, अशा शब्दात जहरी टीका केली. थोरवे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार निशाणा साधला. 

रायगड जिल्ह्यातील महायुतीत जागावाटपावरून वाद झाला. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना (एकनाथ शिंदे) कडे गेला आहे. या मतदारसंघातून महेंद्र थोरवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, त्यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचं आव्हान असल्याचे सांगितले जात आहे. कारण, सुधाकर घारे अपक्ष लढणार असले तरीही त्यांना सुनील तटकरेंचं मोठं पाठबळ असल्याचा आरोप महेंद्र थोरवे यांनी स्वत: केला.  

सुनील घारेंना तटकरेंचे अभय

आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, राष्ट्रवादीचे उमेदवार सुधाकर घारे यांना सुनील तटकरेंचं अभय आहे. सुनील तटकरेंच्या आशीर्वादामुळेच ते अपक्ष उमेदवार म्हणून या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. महायुतीत असतानाही सुनील तटकरे यांनी जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे. त्यामुळे मी हे इतरांच्या निदर्शनास आणून देत आहे. महायुतीचं सरकार आणण्याकरता तिन्ही पक्षाचे नेते प्रयत्न करत आहेत, त्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचं काम सुनील तटकरे करु लागले आहेत. महायुतीला लागलेला कॅन्सर म्हणजे सुनील तटकरे आहे, असे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले.

Advertisement

Latest News

भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे नालासोपारा विरारमध्ये पैसे वाटप करताना सापडल्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. थेट भाजपचा बडा नेता...
विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले- हा भाजपचा नोट जिहाद आहे का?
राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप