आमचे सरकार आल्यावर अदानीकडून मुंबई परत घेईल; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

म्हणाले- कोकणाचे अदानीकरण होऊ देणार नाही, गद्दारांना मतं देऊन फसू नका

On
आमचे सरकार आल्यावर अदानीकडून मुंबई परत घेईल; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray in Sawantwadi Prachar Sabha : भाजपचे लोक काही दिवसांपूर्वी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग सीमेवर अदाणीच्या गोल्फ कोर्ससाठी जागा शोधत होते, अशी माझ्याकडे माहिती आहे. हे लोक अदानीचे दलाल बनून माझ्या कोकणात येतात, कोकणवासीयांना फसवतात. कोकणवासीयांच्या जागा ओरबाडून अदानीच्या चरणी वाहत आहेत. आपल्या हक्काची मुंबई अदानींच्या घशात घातली. आमचे सरकार आल्यानंतर अदानीच्या घशात घातलेली मुंबई परत काढून घेणार, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

सबका मालिक एक असे साईबाबांनी सांगितले होते. भाजपवाले म्हणतात सबका मालिक अदाणी. माझ्या कोकणाचे अदाणीकरण मी होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते सावंतवाडी येथे राजन तेली यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.  

 
तळ कोकणापासून संपूर्ण कोकणात आता आपल्या शिवसेनेचा भगवा फडकवा. बंडखोरी करणाऱ्यांना मत देऊन तुम्ही पापाचे धनी होऊ नका, महाराष्ट्र प्रेमींची मत आता महाराष्ट्र द्रोह्यांच्या पदरात टाकू नका, महाराष्ट्र धर्म जागवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडीतून कोकणातील लोकांना केले. 

मला वाईट पाहवतं नाही 

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला अनेक वर्षांनंतरही उभा आहे, पण यांनी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा एका वर्षात कोसळला. कोकणात जे वाईट सुरू आहे, ते पहावत नाही. कोकणाचे अदानीकरण होऊ देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. केसरकर पडल्यानंतरच सिंधुदुर्गाचे सर्व काही चांगले होईल, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. 

...तर परत कर्जमाफी केली असती
सध्या सगळी जनता, शेतकरी त्रस्त आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर पान्हा फुटला आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली. लोकसभेत फटके पडल्यानंतर यांना माता-भगिनी, शेतकऱ्यांची आठवण आली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवू म्हणताहेत. पण आम्ही कर्जमुक्त करून दाखवले आहे. अडीच वर्षांत सरकार पाडले नसते, तर परत करून दाखवले असते. आमचे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा कर्जमाफी करून दाखवणार असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

Tags:

Advertisement

Latest News

राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
uresh Padvi join BJP : एकीकडे  विनोद तावडे यांनी  मतदारांना पैसे वाटले असा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. विरारमध्ये थरार...
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप 
कोणत्याही स्थितीत गद्दारांना गाडणार; सत्ताधाऱ्यांनी सरकारची तिजोरी लुटली; ठाकरेंची तोफ धडाडली
माझ्या जागेवर दुसरी आणली, हर्षवर्धन जाधवांवर आरोप करत संजना जाधव भर सभेत रडल्या