आमदार साहेब! मांजरा नदीवरील पुलाचे काय झाले?, हंचनाळ नदीवाडी ग्रामस्थांचा संप्तत सवाल 

प्रचारात विकासाचा उदो उदो,  विकास केवळ कागदावरच लोकप्रतिनिधी घोड्यावर 

On
आमदार साहेब! मांजरा नदीवरील पुलाचे काय झाले?, हंचनाळ नदीवाडी ग्रामस्थांचा संप्तत सवाल 

1 किमी अंतरावर असलेल्या गावाला जायला 20 किमीचा वळसा, हाच विकास का?

निलंगा / प्रतिनिधी : तीन टर्म आमदार राहिलेल्या लोकप्रतिनिधीनी मांजरा नदीवरील पुलाच्या कामाला मंजुरीसाठी पाठपुरावाच केला नसल्याने हा पुल कधी होणार ? अशा संतप्त प्रतिक्रिया हंचनाळ व नदीवाडी गावच्या नागरिकांतून विधानसभेच्या प्रचारादरम्यान उमटत आहेत. २०१९ ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली होती पण ती घोषणा हवेतच विरली आता परत निवडणुकीच्या तोंडावर सलग दुसऱ्यांदा देवणी येथील सभेत मंगळवारी पुल मंजुर करण्याची घोषणा गडकरी यांनी केली.आता या घोषणेचे काय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निलंगा तालुक्यातील हंचनाळ व नदीवाडी येथील विद्यार्थी शिक्षणासाठी देवणी तालुक्यातील धनेगाव येथील महादेव विद्यालयात ज्ञानार्जनासाठी येतात.हंचनाळ ते नदीवाडी केवळ १ किमी अंतर आहे.पण मध्येच मांजरा नदी असल्याने व कायम पाणी रहात असल्याने अंबुलगा मार्गे २० किमी चा वळसा घालून यावे लागते.सरकारने विकासाची कामे केली असल्याचा उदोउदो प्रचार दौऱ्यात केला जात असला तरी एक किमी अंतरावर असलेल्या धनेगावला जाण्यासाठी २० किमी अंतरावरुन प्रवास करावा लागतो ही शोकांतिका आहे.प्रत्येक निवडणुकीत पुल करण्याचे आश्वासन देताना नदीवाडीचे सुपुत्र तथा माजी समाजकल्याण सभापती संजय  दोरवे हे संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे निकटवर्तीय असतानाही हा पुल झाला नाही हे विशेष.

हंचनाळ नदीवाडी या गावच्या नागरिकांना बाजारपेठेसाठी वलांडी येथे जावे लागते.हा पुल नसल्याने जास्ती अंतरावरुन प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. नदीचे पात्र ओलांडण्यासाठी लोखंडी कडईतुन जीवघेणा प्रवास करतात.दोन्ही टोकाला दोरी बांधुन दोरीच्या सहाय्याने या कडईतुन विद्यार्थ्यांसह नागरीक प्रवास करतात.१५ वर्षात विकासाचा नुसता गाजावाजा करणाऱ्या शासनाला पुल करणे हा विकास नव्हें का ?असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जनता यावेळी बदल घडविणारं.....

वेळोवेळी प्रशासन व शासनाकडे पाठपुरावा करत आमची छोटी गावे भाजपाच्या पाठीमागे बिनशर्त राहिले.पण भाजपाच्या लोकप्रतिनिधी यांनी केवळ ही ग्रहीत धरुन पुलाचे कामाची मंजुरीच प्रलंबित ठेवली यामुळे आता जनता नक्की बदल घडविणारं हे मात्र खरे....

गडकरीचे आश्वासनही झुठे .....

२०१९ च्या निवडणुकीत प्रचारादरम्यान गावकऱ्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेवुन कैफियत मांडली होती.पण त्यांचाही काही परिणाम झाला नाही.आता सद्यस्थितीत पुन्हा आश्वासन दिले जात आहे.या सरकारकडे केवळ आश्वासने असल्याने आम्ही ग्रामस्थ या निवडणुकीत बदल घडविणारं असल्याच्या प्रतिक्रिया सरपंच मिलन बिरादार यांनी दिल्या.  

Tags:

Advertisement

Latest News

अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात  अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
नागपूर : नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना सोमवारी...
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप 
कोणत्याही स्थितीत गद्दारांना गाडणार; सत्ताधाऱ्यांनी सरकारची तिजोरी लुटली; ठाकरेंची तोफ धडाडली
माझ्या जागेवर दुसरी आणली, हर्षवर्धन जाधवांवर आरोप करत संजना जाधव भर सभेत रडल्या
भारत लोकशाहीची जननी; नायजेरिया भेटीत पीएम मोदींचे प्रतिपादन