गद्दार शब्द ऐकताच मुख्यमंत्री शिंदेंची सटकली

गाडीतून उतरत थेट नसीम खान यांच्या कार्यालयात जात विचारला जाब

On
गद्दार शब्द ऐकताच मुख्यमंत्री शिंदेंची सटकली

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचार सभा जोरदार सुरू आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवल्याची घटना समोर आली आहे. तसेच "गद्दार गद्दार", अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणा ऐकताच मुख्यमंत्री शिंदे गाडीच्या खाली उतरत थेट घोषणा देणाऱ्यांना जाब विचारल्याचे समोर आले आहे.

चांदिवली विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून नसीम खान हे उमेदवार आहेत. त्यांच्या कार्यालयासमोरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जात होता. तेव्हा कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला. तसेच गद्दार असे म्हणत घोषणा देण्यात आल्या. याच वेळी संतोष कटके या तरुणाने मुख्यमंत्री शिंदे यांना उद्देशून अपशब्द वापरले. हे ऐकताच मुख्यमंत्र्यांचा पारा चढला असल्याचे पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी चिडले आणि थेट गाडीतून उतरले आणि समोर असलेल्या नसीम खान यांच्या कार्यालयात चालत गेले. तेथील कॉंग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना "ऐसा सिखाते क्या आप लोग?", अशा कडक शब्दात शिंदेंनी खडसावले. यानंतर पोलिसांनी संतोष कटके आणि इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर सोडून देण्यात आले.

कोण आहे संतोष कटके?

संतोष कटके याचे वडील साधू कटके हे आरपीआय (आठवले गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. संतोष कटकेने मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्याने ते चर्चेत आले आहेत. संतोष कटके यांनी सकाळीच ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट देखील त्याने घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विचारले की काल शाखेत कोण होते? तेव्हा कार्यकर्त्यांनी संतोष कटके याला पुढे केले आणि सांगितले की हाच होता ज्याने गद्दार म्हणले. यावर उद्धव ठाकरे यांनी शाब्बास!! हा फोटो मुद्दाम द्या, त्यांच्यापर्यंत जाऊ द्या, अशी प्रतिक्रिया दिली.

 

Tags:

Advertisement

Latest News

राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
uresh Padvi join BJP : एकीकडे  विनोद तावडे यांनी  मतदारांना पैसे वाटले असा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. विरारमध्ये थरार...
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप 
कोणत्याही स्थितीत गद्दारांना गाडणार; सत्ताधाऱ्यांनी सरकारची तिजोरी लुटली; ठाकरेंची तोफ धडाडली
माझ्या जागेवर दुसरी आणली, हर्षवर्धन जाधवांवर आरोप करत संजना जाधव भर सभेत रडल्या