राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप
विनोद तावडेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं; म्हणाले- तुम्हाला कॉंग्रेसची साथ कशी चालते?
मुंबई : विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत अदानी आणि रॉबर्ट वॉड्रा यांचे फोटो दाखवत राहुल गांधी यांच्या आरोपांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच एक है तो सेफ है आणि राहुल गांधी फेक है, अशी टीका देखील त्यांनी केली. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मोदी शहांसह महाराष्ट्राच्या महायुती सरकारवर हल्लाबोल चढवला होता.
RCC New
एक है तो सेफ है राहुल गांधीके मन मे शेख है
धारावीची जमीन अदानीला देणार, असे राहुल गांधी म्हणतात. मात्र खरे असे आहे की ही जमीन महाराष्ट्र सरकारकडेच राहणार आणि ज्याने ते टेंडर घेतले त्याला ती जागा जाणार, असे विनोद तावडे यांनी सांगितले आहे. या टेंडरमध्ये एक कंपनी अदानीची होती, एक कंपनी ही अबू धाबीमधली होती, त्यात ज्याला टेंडर मिळाले त्याला हे काम देण्यात येणार आहे. धारावीमध्ये जे लोक राहतात त्या सर्वांना घरे मिळणार, असेही विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. आता धारावीच्या जागेसाठी अबू धाबीच्या शेखची सुद्धा कंपनी होती, मात्र, त्यांना ते मिळाले नाही. मग आम्ही असे म्हणायचे का एक है तो सेफ है राहुल गांधीके मन मे शेख है, असे म्हणायचे का आम्ही? असा सवालही विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक सर्वात जास्त
राहुल गांधी म्हणतात महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प गेले. एयर बसचा उल्लेख त्यांनी केला, त्यानंतर फॉक्सकॉन कंपनी कशी महाराष्ट्राबाहेर गेले हे त्यांनी सांगितले. मात्र महायुतीच्या काळात एकही प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला नाही. महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक सर्वात जास्त आहे, 2022-23 आणि 2023-24 या वर्षात 1.18 लाख कोटी आणि 1.25 लाख कोटी, 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत 70 हजार 795 कोटींची गुंतवणूक ऑलरेडी आलेली आहे. ही जर आकडेवारी सांगायची झाली तर एकूण गुंतवणुकीच्या सरासरी 21 टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात आली आणि आता तिमाहीही 52 टक्के आली आहे. ही वस्तुस्थिती असताना राहुल गांधी महाराष्ट्राच्या जनतेला फसवण्याचा फेक प्रयत्न करत असल्याचा आरोप विनोद तावडे यांनी केला आहे.
शेखला धारावीची जमीन द्यायची आहे का?
ज्यावेळी अदानीला तुमच्याच काळात एवढ्या गोष्टी दिल्या, 1990 मध्ये मुंदरा, 2005 मध्ये फूड कार्पोरेशनचे अॅग्रीमेंट तुम्ही केले मनमोहन सिंह यांच्या काळात, एमडीओचे कॉंट्रॅक्ट तुम्ही त्यांना दिले, 2010 ला इंडोनेशिया आणि यांचे अॅग्रीमेंट तुम्ही करून दिले. हे वासताव आहे. इथे येऊन गरीब धारावीकरांना घर मिळणार नाही असे सांगून कुठल्या तरी शेखला धारावीची जमीन द्यायची आहे का? असा सवाल विनोद तावडे यांनी राहुल गांधी यांना विचारला आहे.