वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊ द्यायची नाही- शरद पवारांचा हल्लाबोल 

तासगाव मतदारसंघातून पवारांची तोफ डागली; म्हणाले - आरआर आबांचा वारसा रोहित पाटील चालवेल 

On
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊ द्यायची नाही- शरद पवारांचा हल्लाबोल 

सांगली: विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि डाव्या कम्युनिस्ट पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढत आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात वाट्टेल ते झालं तरी चालेल पण देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या घटकांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही. त्यादृष्टीने ही विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. ते शुक्रवारी आर. आर. आबांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या प्रचारासाठी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलत होते.  आबांचा वारसा हे रोहित पाटील पुढे चालवतील अशी मला खात्री आहे, असेही शरद पवार म्हणाले. 

मोदींचा हेतू ओळखला अन् आम्ही सतर्क झालो 

यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या संविधानाविषयीच्या हेतूविषयी शंका उपस्थित केली. आम्ही एकेकाळी नरसिंह राव यांच्या नेतृत्त्वाखाली 250 पेक्षा कमी जागा असताना केंद्रात सरकार चालवले होते. पण मोदी साहेब सांगतात की, आम्हाला 400 जागा द्या. त्यामुळे आमच्या मनात शंका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली घटना बदलायची असले तर संसदेत खासदारांची मोठी संख्या असणे आवश्यक असते. आजच्या राज्यकर्त्यांच्या मनात वेगळा विचार आहे, त्यासाठी ते सातत्याने 400 जागांची मागणी करत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

पैसे देण्यापेक्षा महिलांचे संरक्षण महत्त्वाचे

आम्ही निवडणुकीत फक्त जिंकण्यासाठी मतं मागत नाही, आम्ही काम करण्यासाठी मतं मागतो, आमचा कार्यक्रम आहे, त्यासाठी मतदान करा, असा आग्रह धरतो. आज ज्यांच्याकडे राज्याची सत्ता आहे. ते पैशांचा गैरवापर करत आहेत. निवडणुकीत दुसरं काही नाही फक्त पैसे  टाकायचे आणि माणसं विकत घ्यायचा प्रयत्न करायचा, हेच सरकारचे धोरण आहे. 

या सरकारने काही कार्यक्रम हाती घेतले आहेत. पण या कार्यक्रमातील सत्यता पडताळण्याची गरज आहे. महिलांसाठी लाडकी बहीण योजना सरकारने सुरु केली. तुम्ही महिलांना पैसे दया, याबाबत तक्रार नाही. पण 1500 रुपये देण्यासोबतच महिलांचे रक्षण करणेही तितकेच आवश्यक आहे. महाराष्ट्रात आज स्त्रिया सुरक्षित आहेत, असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली. दोन वर्षात राज्यातील 67381 महिलांवर अत्याचार झाले. जवळपास तेवढ्याच महिला बेपत्ता आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले.

रोहित चिंता करु नको : शरद पवार 
रोहित पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले की, मला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण तुम्ही चिंता करु नका, तुम्हाला कोणीही एकटे पाडू शकणार नाही. तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन तालुक्यातील तरुणांची शक्ती जोपर्यंत तुमच्या पाठीशी आहे, तोपर्यंत रोहित पाटील यांना चिंता करण्याचे कारण नाही. याशिवाय, त्यांच्यामागे आर.आर. आबांची पुण्याई आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात आर.आर. आबा हे नाव माहिती आहे. 

इकडचे माजी खासदार उद्योगी आहेत, याची मला माहिती आहे. त्यांची पहिली विधानपरिषद आठवते. आर. आर. पाटील एक दिवस माझ्याकडे आले आणि म्हणाले, विधानपरिषदेच्या एका जागेसाठी माझा आग्रह आहे. मी म्हटलं कोणाच्या नावासाठी, तर आर. आर. म्हणाले, संजय पाटलांच्या. मी म्हटलं, मला पसंत नाही, दुसरं नाव सांगा. पण आर. आर. पाटलांनी खूपच आग्रह धरला. मी म्हटलं त्यांचा काही भरवसा नाही, ते तुमच्यासोबत राहतील याची खात्री नाही, मग कशाला खात्री धरताय. तर आर.आर. म्हणाले, ते माझ्या भागातील आहेत. काही करा पण माझं एवढं ऐका. शेवटी आम्हाल आर. आर. यांचा आग्रह मोडता आला नाही. त्यानंतर संजयकाका पाटील सहा वर्षे आमदार राहिले.

ज्यादिवशी आमदारकीच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस होता, त्यादिवशी भाजपात गेले. त्यानंतर ते 10 वर्षे खासदार राहिले. आता खासदारकी गेल्यानंतर त्यांनी पुन्हा पक्ष बदलला. मी काही दिवसांपूर्वी सांगलीत कार्यक्रमासाठी आलो होतो. तेव्हा संजयकाका पाटलांना विचारले होते की, विधानसभेला काय करणार? तेव्हा ते म्हणाले काही नाही, आपल्या भागातील उमेदवाला पाठिंबा देणार. पण 8 दिवसांमध्येच त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून निवडणुकीचा अर्ज भरला, असे शरद पवार यांनी सांगितले.

Tags:

Advertisement

Latest News

दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी  दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
मंदिरा बेदी हे नाव मनोरंजन जगतात खूप प्रसिद्ध आहे. शांती या दूरदर्शनवरील मालिकेपासून सुरुवात केलेल्या मंदिरा बेदीने क्रिकेट समालोचक म्हणून...
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप 
कोणत्याही स्थितीत गद्दारांना गाडणार; सत्ताधाऱ्यांनी सरकारची तिजोरी लुटली; ठाकरेंची तोफ धडाडली
माझ्या जागेवर दुसरी आणली, हर्षवर्धन जाधवांवर आरोप करत संजना जाधव भर सभेत रडल्या
भारत लोकशाहीची जननी; नायजेरिया भेटीत पीएम मोदींचे प्रतिपादन 
पुष्पा-2 ट्रेलर रिलीज : अल्लू अर्जून पहिल्या भागापेक्षा डेंजर भूमिकेत दिसला