23 सिक्स, 17 चौकार अन् 283 धावांचा पल्ला; संजू सॅमसन-तिलक वर्माने रचला नवा इतिहास
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची सर्वात मोठी धावसंख्या; वाचा-सामन्यात दोघांनी काय केला कहर
Ind vs sa 4th T20, Tilak Warma, Sanju Samson : भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 4 सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना खेळला जात आहे. जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
जोहान्सबर्ग टी-20 सामन्यात भारताने एक मोठा विक्रम केला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 1 बाद 283 धावा केल्या. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेसमोर 284 धावांचे टारगेट दिले. दुसरे म्हणजे भारताकडून संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी शतके झळकावली. या मालिकेत संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्यांदा शतकाचा टप्पा ओलांडला आहे.
संजू-तिलकच्या शतकांनी केला ऐतिहासिक विक्रम
सामन्यात भारतीय संघ सुरुवातीपासूनच आक्रमक दिसत होता. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा (36) यांनी सलामीला 73 धावांची भागीदारी केली. यानंतर संजूने तिलत वर्मासोबत विक्रमी 93 चेंडूत 210 धावांची नाबाद भागीदारी केली. संजू सॅमसनने 51 चेंडूत शतक तर टिळक वर्माने 41 चेंडूत शतक झळकावले.
संजू सॅमसनने 56 चेंडूत 109 धावा काढल्या
संजू सॅमसनने 56 चेंडूत 109 धावांची शानदार खेळी केली. तर तिलकने 47 चेंडूत 120 धावा केल्या. संजूचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे शतक होते, जे त्याने गेल्या 5 सामन्यांमध्ये झळकावले आहे. दुसरीकडे, तिलक वर्माचे हे दुसरे शतक होते. या मालिकेतही त्याने सलग दोन्ही शतके झळकावली आहेत. तर आफ्रिकन संघाकडून लुथो सिपमला याने एकमेव विकेट घेतली.