वंचितच्या कार्यकर्त्यांची अपक्ष उमेदवाराला मारहाण : भाजपला पाठिंबा दिल्याने संताप

On
वंचितच्या कार्यकर्त्यांची अपक्ष उमेदवाराला मारहाण : भाजपला पाठिंबा दिल्याने संताप

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवाराला काळे फासत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वंचितला पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराने भाजपला पाठिंबा दिल्याने वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

RCC New

RCC New

वंचित बहुजन आघाडीचे शैलेश कांबळे यांनी अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना काळे फासत मारहाण करण्यात आली आहे. सचिन चव्हाण यांना काळे फासत शैलेश कांबळे म्हणाले, सचिन चव्हाण यांनी जो काही प्रकार केला आहे याचा आम्ही निषेध करतो. बाळासाहेब आंबेडकरांना धोका या सचिन चव्हाण याने दिला आहे, असे म्हणत शैलेश कांबळे यांनी चाबकाने मारहाण केली आहे.

अपक्ष उमेदवार सचिन भीमराव चव्हाण यांनी सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला होता. मात्र त्यांनी हा पाठिंबा काढून घेत आता भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यातून शैलेश कांबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सचिन चव्हाण यांच्या तोंडाला काळे फासले. तसेच बाळासाहेब आंबेडकरांना धोका दिला म्हणत त्यांनी सचिन चव्हाण यांना चाबकाने फटके मारले असल्याचे समोर आले आहे.

विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील सर्वच भागांमध्ये राजकीय पक्षांकडून उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात येत आहेत. तसेच इतर पक्षांकडून व अपक्ष उमेदवारांकडून देखील पाठिंबा मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. तसेच निवडणुकीच्या रिंगणात आता तिसरी आघाडीने देखील उडी घेतली आहे. आमदार बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे व राजू शेट्टी यांनी मिळून तिसरी आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Tags:

Advertisement

Latest News

अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात  अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
नागपूर : नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना सोमवारी...
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप 
कोणत्याही स्थितीत गद्दारांना गाडणार; सत्ताधाऱ्यांनी सरकारची तिजोरी लुटली; ठाकरेंची तोफ धडाडली
माझ्या जागेवर दुसरी आणली, हर्षवर्धन जाधवांवर आरोप करत संजना जाधव भर सभेत रडल्या
भारत लोकशाहीची जननी; नायजेरिया भेटीत पीएम मोदींचे प्रतिपादन