नवनीत राणांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या, कार्यकर्त्यांची फ्री स्टाईल! अमरावतीच्या सभेत राडा, VIDEO
नवनीत राणा म्हणाल्या- धर्मांध लोकांनी माझ्या सभेवर हल्ला केला, तरीही आम्ही शांत राहिलो
BJP Leader Navneet Rana Rally Attack Video Update : विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक असताना प्रचार शिगेला पोहोचला आहे. उद्या म्हणजेच सोमवारी प्रचाराची सांगता होणार असल्याने सर्वच नेत्यांनी सभांचा धडाका सुरु ठेवला आहे. काल शनिवारी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील खल्लार येथे युवा स्वाभिमानचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचार सभेत मोठा राडा झाला. या प्रचारसभेत माजी खा. नवनीत राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला असून, याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
RCC New
खल्लार येथे नेमकं काय घडलं
काल शनिवारी रात्री खल्लार येथे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार अरुण बुंदीले यांच्यासाठी माजी खा. नवनीत राणा यांनी सभा घेतली. राणा सभेला संबोधित करत असताना काहींनी जोरदार घोषणाबाजी केली. काहींनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालविणाऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यानंतर थेट राणा यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली. गोंधळ थांबत नसल्याने स्वत: नवनीत राणा जमावाकडे समजून सांगण्यासाठी गेल्या. तेथे काहींनी त्यांच्या अंगावर खुर्च्या फेकून मारल्या. त्यातील काही खुर्च्या या राणा यांच्या बॉडीगार्डला लागल्या. त्यात तो किरकोळ जखमी झाला.
#WATCH | Amravati, Maharashtra: On yesterday's violence during her election rally, BJP leader Navneet Rana says, "... Religious slogans were raised while I was addressing a public rally in Khallar Village. I tried to calm them down... I ended my speech and got down to meet the… pic.twitter.com/wF88XMXQY1
— ANI (@ANI) November 17, 2024
राणा यांनी केला गंभीर आरोप
या घटनेनंतर नवनीत राणा यांना सभा आटोपती घ्यावी लागली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राणा म्हणाल्या, रमेश बुंदीले यांच्या प्रचारासाठी खल्लारमध्ये सभा सुरू होती. सभा शांततेत सुरू असतांना मी भाषण सुरु केल्यावर काही लोकांनी गोंधळ घालला. या जमावाने मला अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ केली. जमावाने नंतर जास्त गोधळ घातला. मी भाषण सोडून त्यांची समजूत काढण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी माझ्या अंगावर खुर्च्या फेकल्या. या प्रकरणी आम्ही पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक झाली नाही, तर रविवारी रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करणार आहोत.
— Navnit Ravi Rana (@navneetravirana) November 17, 2024
पोलिसांकडून चार जणांना अटक
नवनीत राणा यांनी खल्लार पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ पावले उचलली. खल्लार पोलिसांनी ॲट्रॉसिटी ॲक्टसह ४५ ते ५० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. राणा यांनी सगळ्या आरोपींना अटक झाली नाही तर रस्तयावर उतरण्याचा इशारा दिल्याने वातावरण तंग आहे. पोलिस सगळ्या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत.