'ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य, तर आम्ही छत्रपती अन् सावरकरांच्या विचारांचे पाईक '

अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल; धुळ्यातील सभेतून राहुल गांधीचा घेतला समाचार

On
'ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य, तर आम्ही छत्रपती अन् सावरकरांच्या विचारांचे पाईक '

Maharashtra Assembly Election 2024 : सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंची सर्व तत्त्वे विसरले असल्याचा आरोप त्यांनी केला. औरंगाबादच्या नामांतरला विरोध करणारे, राम मंदिराच्या उभारणीला विरोध करणारे, कलम 370 हटवण्यास विरोध करणारे, पाकिस्तानविरुद्धच्या सर्जिकल स्ट्राईकवर आक्षेप घेणाऱ्या औरंगजेब फॅन क्लबसोबत उद्धव ठाकरे असल्याचा आरोप त्यांनी केला. तर दुसरीकडे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर यांच्या तत्त्वांनुसार काम करणारे लोक आहोत, असे म्हणत शहांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

धुळे जिल्ह्यातील जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. राज्यातील महाविकास आघाडी केवळ तुष्टीकरण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

चौथी पिढी जरी आली तर मुस्लिमांना आरक्षण नाही 

राहुल गांधी यांनी कान उघडे ठेवून ऐकवे, की तुमची चौथी पिढी आली तरी देखील मुस्लिम समाजाला आरक्षण देता येणार नाही. मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर एससी, एसटी, ओबीसी आणि इतर समाजातील आरक्षण कमी करून द्यावे लागणार आहे. मात्र ते होणे शक्य नसल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. देशातील सर्व उलेमांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेतली असून त्यांच्याकडे आरक्षणाची मागणी केली असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. या मुद्द्यावरून अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील जोरदार हल्ला चढवला.

राहुल गांधी जरी स्वर्गातून आल्या तरी कलम  हटणार नाही

जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम वापस आणण्याचा प्रस्ताव काँग्रेसने केला आहे. मात्र राहुल गांधीच नाही तर इंदिरा गांधी देखील स्वर्गातून परत आल्या तरी 370 कलम परत आणू शकत नसल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. कलम 370 आता हटवण्यात आले असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. सुशील कुमार शिंदे गृहमंत्री असताना कश्मीरमधील लाल चौकात जायला भीती वाटत असल्याचे म्हणाले होते. मात्र आता तुम्ही गृहमंत्री नाही तर मी गृहमंत्री आहे. तुमच्या नातवांना घेऊन काश्मीरला जा, तुमच्या केसांना देखील धक्का लागणार नसल्याचे आव्हान यावेळी अमित शहा यांनी सुशीलकुमार शिंदे यांना दिले आहे.


 

Advertisement

Latest News

दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी  दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
मंदिरा बेदी हे नाव मनोरंजन जगतात खूप प्रसिद्ध आहे. शांती या दूरदर्शनवरील मालिकेपासून सुरुवात केलेल्या मंदिरा बेदीने क्रिकेट समालोचक म्हणून...
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप 
कोणत्याही स्थितीत गद्दारांना गाडणार; सत्ताधाऱ्यांनी सरकारची तिजोरी लुटली; ठाकरेंची तोफ धडाडली
माझ्या जागेवर दुसरी आणली, हर्षवर्धन जाधवांवर आरोप करत संजना जाधव भर सभेत रडल्या
भारत लोकशाहीची जननी; नायजेरिया भेटीत पीएम मोदींचे प्रतिपादन 
पुष्पा-2 ट्रेलर रिलीज : अल्लू अर्जून पहिल्या भागापेक्षा डेंजर भूमिकेत दिसला