कोचिंग सेंटर 100% निवड-नोकरीचा दावा करू शकणार नाहीत; केंद्राकडून गाइडलाईन जारी
टॉपर्सचे फोटो परवानगीशिवाय छापता येणार नाही; सरकार म्हणाले- आम्ही कोचिंगंच्या विरोधात नाही
नवी दिल्ली : केंद्र सरकारने बुधवारी कोचिंग सेंटरसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यात कोचिंग सेंटर्स यापुढे 100% निवड आणि 100% जॉब प्लेसमेंटचा दावा करू शकणार नाहीत. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवण्यासाठी हे करण्यात आले आहे.
कोचिंग सेंटर्स ग्राहकांची दिशाभूल करणार नाही
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण यांच्यानुसार, कोचिंग सेंटर्स यापुढे ग्राहकांची दिशाभूल करणारे खोटे दावे करू शकत नाहीत. अनेक तक्रारींनंतर सरकारने हा निर्णय घेतला. आतापर्यंत 54 कोचिंग संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या असून सुमारे 54.60 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कोणाला लागू आहे ही गाइडलाईन
ही मार्गदर्शक तत्त्वे सर्व संस्था, कोचिंग सेंटर्स आणि शैक्षणिक सहाय्य, शिक्षण, मार्गदर्शन आणि शिकवणी सेवांशी संबंधित संस्थांसाठी वैध असतील. जर कोचिंग सेंटर्सने याचे पालन केले नाही तर त्यांच्यावर ग्राहक संरक्षण कायद्यान्वये कारवाई केली जाईल.
सरकार कोचिंग सेंटरच्या विरोधात नाही
ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे म्हणाल्या, 'आम्ही कोचिंग सेंटर्स विद्यार्थ्यांना प्रलोभन देण्यासाठी जाणीवपूर्वक सत्य लपवत असल्याचे पाहिले आहे. यामुळेच आम्हाला कोचिंग उद्योगासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे आणावी लागली. सरकार कोचिंग सेंटर्सच्या विरोधात नाही, पण कोणत्याही जाहिरातीचा दर्जा हा ग्राहक हक्कांच्या विरोधात असू शकत नाही.