मविआचे सरकार खोके देऊन मोदी-शहांनी चोरले; राहुल गांधींचा अकोल्यातून हल्लाबोल

म्हणाले- पंतप्रधान मोदींना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासारखा स्मृतीभ्रशांचा आजार जडलाय

On
मविआचे सरकार खोके देऊन मोदी-शहांनी चोरले; राहुल गांधींचा अकोल्यातून हल्लाबोल

अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्मृतिभ्रंशाचा गंभीर आजार जडल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी अमरावती येथील प्रचारसभेत बोलताना केली. पंतप्रधान मोदींना स्मृतिभ्रंशाचा आजार झाला आहे. त्यामुळेच ते आरक्षण व जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावरून माझ्यावर टीका करत आहेत, असे ते म्हणालेत. राहुल यांनी यासंबंधी अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांचा दाखला दिला. बायडेन अनेकदा आपल्या भाषणात महत्त्वाचे मुद्दे विसरत होते, असे ते त्यांचा नामोल्लेख टाळत म्हणाले.

राहुल गांधी यांची शनिवारी अमरावतीत प्रचारसभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षण, जातनिहाय जनगणना, बेरोजगारी, शेतकरी समस्या, अर्थव्यवस्था, समाजातील वाढता जातीयवाद, धार्मिक ध्रुवीकरण आदी विविध मुद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्मृतीभ्रंशाचा आजार जडल्याचाही आरोप केला.

देशात दिनदुबळ्यांची 90 टक्के लोकसंख्या

आमचा लढा संविधानासाठी आहे. काँग्रेस महात्मा गांधी, महात्मा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांसाठी आहे. हे सर्वजण आज असते तर त्यांनी जातनिहाय जनगणनेचा आग्रह धरला असता. पण मोदींची हे करण्याची इच्छा नाही. कारण मागासवर्ग, आदिवासी, दलित यांची संख्या 90 टक्क्यांच्या आसपास आहे. पण त्यानंतरही त्यांचा सरकारमध्ये नगण्य वाटा आहे. त्यांच्यावर इतर लोक राज्य करत आहेत.

मी गरिबांच्या मालमत्तेची त्यांच्या जमिनीचे संरक्षण करतो. त्यामुळे या सरकारने माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी माझा अपप्रचार करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले. हे का केले तर मी धनदांडग्यांचा नव्हे तर गरिबांचा कैवार घेतो म्हणून केले गेले. मुंबईतील धारावीची लाखो कोटींची जमीन अदानींना दिली जात असेल तर तेवढाच पैसा देशातील गरिबांच्या खिशात गेला पाहिजे असा माझा आग्रह आहे.

जीएसटी शेतकऱ्यांना मारण्याची पद्धत

राहुल गांधी म्हणाले, मोदींनी रोजगाराची व्यवस्था संपुष्टात आणली आहे. त्यामुळे समाजात द्वेष वाढत आहे. आज देशातील कोणत्याही राज्यातील तरुणांना रोजगार मिळत नाही. कारण उद्योगपती आपल्या बाजारात चीनचा माल विकत आहेत. देशातील सर्वच कारखाने बंद झालेत. छोटे व्यवसाय बंद झालेत. नोटाबंदी ही योजना नव्हती तर शस्त्र होती. जीएसटी शेतकऱ्यांना मारण्याची पद्धत आहे, छोट्या व्यापाऱ्यांना संपवण्याचे कारस्थान आहे. अदानी व अंबानी यांचा मार्ग मोकळा करण्याची पद्धती आहे. यामुळे देशाची सर्वच संपत्ती 20-25 लोकांच्या हातात गेली. देशाला रोजगार देणारे शेतकरी, छोटे उद्योगपती देशोधडीला लागले. यामुळे देशात द्वेष पसरत आहे.

पण मोदी याकडे दुर्लक्ष करत आहेत. ते केवळ मन की बात करण्यात व्यस्त आहेत. त्यांनी देशासाठी रोजगार आणावेत, महागाई कमी करावी, शेतकऱ्यांना योग्य एमएसपी द्यावी, मजुरांना मदत करा. अब्जाधीशांना मदत करू नका. त्यांनी तुम्हाला निवडले नाही. जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे, असेही राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले.

मोदींना अमेरिकन अध्यक्षांसारखा आजार

राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी आता राहुल गांधी यांचा आरक्षणाला विरोध असल्याचा आरोप करत आहेत. माझी बहीण मला सांगत होती की, मोदी सध्या जे आपण बोलत आहोत, तेच बोलत आहेत. कदाचित त्यांना स्मृतीभ्रंशाचा आजार झाला असावा. त्यांची गत अमेरिकेच्या अध्यक्षांसारखी (जो बायडेन) झाली आहे. त्यांनाही वेळोवेळी तुम्हाला हे नाही तर ते बोलायचे आहे असे सांगावे लागत होते. तिथे युक्रेनचे अध्यक्ष आले असता ते रशियाचे अध्यक्ष पुतीन आल्याचे सांगत होते. त्यानंतर त्यांच्या मागे उभे असलेल्या लोकांना त्यांना हे पुतीन नव्हे तर युक्रेनचे अध्यक्ष असल्याचे सांगावे लागत होते. त्यांना स्मृतीभ्रंश झाला होता. तसाच स्मृतीभ्रंश आपल्या पंतप्रधानांचा होत आहे.

कदाचित ते पुढल्या भाषणात ते महाराष्ट्राचे सरकार सोयाबिनला प्रतिक्विंटल 7 हजार रुपयांचा भाव देत असल्याचा दावा करतील. मी म्हणतो भाजप संविधानावर हल्ला करत आहे, ते म्हणतात काँग्रेस संविधानावर हल्ला करत आहे. मी प्रत्येक भाषणात विशेषतः मागील वर्षभरापासून भाजपवर संविधानावर हल्ला करण्याची टीका करत आहे. आता मोदी हेच आरोप आमच्यावर करत आहेत.

माझ्यावर जातनिहाय जनगणनेला विरोध केल्याचाही आरोप करतील

मी प्रत्येक भाषणात आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याचा दावा करत आहे. लोकसभेतही मी मोदींपुढे हे सांगितले. पण मोदी स्मृतीभ्रंशामुळे माझ्यावरच आरक्षणाला विरोध असल्याचा आरोप करत आहेत. मी मोदींपुढेत जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. पण कदाचित मोदी आपल्या पुढल्या भाषणात माझा जातनिहाय जनगणनेला विरोध असल्याचा आरोप करतील, असे राहुल गांधी म्हणाले.

मी वर्षभरापासून आरक्षण, जातनिहाय जनगणना आदी मुद्यांवर बोलत आहेत, पण माध्यमे ते दाखवत नाहीत. कारण ते उद्योगपतींचे सरकारचे गुलाम आहेत. पण आज माझ्या आरोपानंतर ते मोदींची स्मृती जबरदस्त आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतील. मोदी एकदा ऐकले तर 70 वर्षे विसरत नाहीत असे ते म्हणतील. एवढेच नाही तर त्याच्यासोबत ते मोदींनी तलावात जाऊन मगर पकडल्याची कथाही जोडतील. पण मोदी जेव्हा गंगेत जातील तेव्हा त्यांना पोहणे येत असल्याचे वाटत नाही, असेही राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले.

महाविकास आघाडीचे सरकार कुणी चोरले हे सर्वश्रूत

राहुल गांधी यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यावरून मोदी व शहांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला महाविकास आघाडीचे सरकार का चोरी करण्यात आले हे माहिती आहे. ते सरकार धारावीच्या मुद्यावरून चोरी करण्यात आले होते. भाजपच्या लोकांना नरेंद्र मोदी, अमित शहा यांना धारावीची जमीन महाराष्ट्राच्या गरिबांची जमीन 1 लाख कोटींची जमीन आपले मित्र गौतम अदानी यांना द्यायची होती. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचे सरकार आपल्या हातांनी चोरी केले. हे जगजाहीर आहे.

सर्वांच्या डोळ्यांदेखत कोट्यवधी रुपये देऊन आमदार खरेदी करून जनतेचे सरकार पाडले गेले. मोदी व शहांनी हे काम केले. या प्रकरणात दिलेले पैसे आकाशातून पडले नव्हते. भारतात 40-50 कोटी रुपये कुणीच कुणाला देत नाही. या प्रकरणात धारावीच्या जमिनीचा सौदा झाला आहे. त्यामुळेच आमदारांना कोट्यवधी रुपये देण्यात आले. हे पैसे कुणी दिले, कुणी ऑर्डर दिले, हे अवघ्या देशाला माहिती आहे. महाराष्ट्रातील 6 वर्षाच्या मुलालाही हे माहिती आहे. या प्रकरणी कुणालाही सांगण्याचीही गरज नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

Tags:

Advertisement

Latest News

राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
uresh Padvi join BJP : एकीकडे  विनोद तावडे यांनी  मतदारांना पैसे वाटले असा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. विरारमध्ये थरार...
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप 
कोणत्याही स्थितीत गद्दारांना गाडणार; सत्ताधाऱ्यांनी सरकारची तिजोरी लुटली; ठाकरेंची तोफ धडाडली
माझ्या जागेवर दुसरी आणली, हर्षवर्धन जाधवांवर आरोप करत संजना जाधव भर सभेत रडल्या