कौटुंबिक कलहामुळे त्रस्त व्यक्तीने घेतला 35 जणांचा जीव; कारने उडवले!
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; कुठे घडला थरार, वाचा सविस्तर...!
Accident Latest News : कौटुंबिक कलहामुळे त्रस्त झालेल्या एका वृद्ध व्यक्तीने भरधाव कार चालवत सुमारे 35 जणांचा जीव घेतला आहे, तर 45 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. ही धक्कादायक घटना चीनच्या झुहाई शहरात सोमवारी मध्यरात्री घडली. वृत्तसंस्था एपीद्वारे ही माहिती समोर आली आहे.
घटस्फोटामुळे त्रस्त, वृद्ध व्यक्तीने लोकांवर कार चढवल्याने हा भीषण अपघात घडला. पत्नीसह मालमत्तेच्या वाटणीचा त्या वृद्ध व्यक्तीच्या डोक्यात राग होता. त्याचा भयंकर पडसाद पाहायला मिळाला. दरम्यान, पोलिसांनी सदर व्यक्तीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फॅन नावाचा आरोपी घटस्फोटानंतर संपत्तीच्या वाटणीवरून पत्नीवर रागावला होता. ही घटना एका क्रीडा संकुलाजवळ घडली. जिथे लोक व्यायामासाठी आले होते. हा हल्ला होता की अपघात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारमध्ये फैनला चाकूसह पकडण्यात आले. त्याच्या मानेवर स्वत:ला इजा केल्याच्या खुणा होत्या. त्याला पकडले तेव्हा तो बेशुद्ध होता, त्याच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
35 people were killed and another 43 injured when a driver rammed his car into people exercising at a sports center in the southern Chinese city of Zhuhai, police in China said.
— T_CAS videos (@tecas2000) November 12, 2024
The 62-year-old driver has been detained. pic.twitter.com/pEKHWgva5k
चीनने ही बातमी सेन्सॉर केली
झुहाई येथे मंगळवारी लष्करी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे चीन सरकारने लोकांच्या मृत्यूच्या बातम्या सेन्सॉर केल्या. वृत्तसंस्था एपीच्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी या बातमीशी संबंधित अनेक लेख चिनी मीडियातून काढून टाकण्यात आले. याशिवाय जे लेख प्रसिद्ध झाले ते फोटो व व्हिडीओशिवाय प्रसिद्ध झाले. तथापि, या घटनेशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल झाले. यंग ली नावाच्या युजरने हे पोस्ट केले होते. या व्हिडिओंमध्ये अनेक लोक रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले दिसत होते.