पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड, दिल्लीहून पाठवले नवीन विमान 

झारखंडच्या देवघर विमातळावरील घटना; राहुल गांधी यांनाही दीड तास थांबावे लागले 

On
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड, दिल्लीहून पाठवले नवीन विमान 

देवघर, झारखंड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. टीव्ही 9 वृत्तवाहिणीने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान हे देवघर विमानतळावर होते. परंतु, त्यांच्या विमानात बिघाड झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे त्यांना दिल्लीला पोहण्यास विलंब होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात बिघाड झाल्याची पहिलीच घटना आहे. त्यांच्या विमानात नेमकी बिघाड काय झाली, याबाबात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मोदी यांना दिल्लीला जाण्यास विलंब लागणार आहे. मोदी यांना दिल्लीला जायचे होते, परंतु, तत्पूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात प्रचाराच्या दौऱ्यावर होते. हा त्यांचा दौरा गुरूवारीच संपला होता. शिवाजी पार्कवर त्यांची शेवटची सभा पार पडली होती. या सभेनंतर ते दिल्लीत परतले होते. आज पंतप्रधान मोदी झारखंड दौऱ्यावर होते. या दरम्यान ते एका विशेष विमानाने देवघर आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने जमुईला गेले होते. त्यानंतर परतीच्या प्रवासा दरम्यान पंतप्रधान मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली आहे. विमानातील या तांत्रिक समस्येनंतर देवघर विमान तळावर विमान उतरवण्यात आले आहे.तसेच या घटनेने नरेंद्र मोदींच्या या पुढील प्रवासासा उशीर होत आहे.


मोदींची जमुई येथे आदिवासी गौरव दिन कार्यक्रमाला हजेर  

पीएम मोदी आदिवासी गौरव दिन साजरा करण्यासाठी जमुई येथे पोहोचले होते, त्यांनी तेथेही रॅली काढली आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित आदिवासी गौरव दिन सोहळ्यात भाग घेतला. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, आदिवासी समाजानेच राजकुमार रामाला भगवान राम बनवले. आदिवासी समाज हा देशाच्या संस्कृती आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी शेकडो वर्षांचा लढा आहे. 

ग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या दशकांमध्ये आदिवासींच्या इतिहासातील अमूल्य योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामागेही स्वार्थाने भरलेले राजकारण होते. देशाच्या स्वातंत्र्याचे श्रेय एकाच पक्षाला द्यायचे, असे राजकारण होते. पण, जर एकाच पक्षाने, एकाच कुटुंबाने स्वातंत्र्य मिळवले असेल, तर मग भगवान बिरसा मुंडा यांचे उलगुलान आंदोलन का करण्यात आले? संथाल क्रांती काय होती? कोळसा क्रांती काय होती, असं त्यांनी सांगितलं.

Tags:

Advertisement

Latest News

अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात  अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
नागपूर : नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना सोमवारी...
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप 
कोणत्याही स्थितीत गद्दारांना गाडणार; सत्ताधाऱ्यांनी सरकारची तिजोरी लुटली; ठाकरेंची तोफ धडाडली
माझ्या जागेवर दुसरी आणली, हर्षवर्धन जाधवांवर आरोप करत संजना जाधव भर सभेत रडल्या
भारत लोकशाहीची जननी; नायजेरिया भेटीत पीएम मोदींचे प्रतिपादन