18, 19 तारखेला शाळांना सार्वजनिक सुट्टी नाही, शिक्षण आयुक्तांचा आदेश
25 नोव्हेंबरला होणारी रचना सहायक परीक्षा पुढे ढकलली
महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत 25 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत रचना सहायक पदाची परीक्षा घेण्यात येणार होती. ही परीक्षा काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक विभागाच्या संकेतस्थळावर लवकरच कळवण्यात येईल. असे राज्याच्या राज्यस्तरीय निवड समितीच्या वतीने पत्राद्वारे कळवले आहे.
RCC New
दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील रचना सहायक गट ब, उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक गट ब संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांची 25, 26, 27 नोव्हेंबर या कालावधीत ही परीक्षा होणार होती. दरम्यान निम्नश्रेणी लघुलेखक व उच्चश्रेणी लघुलेखक या पदांच्या परीक्षा 26 नोव्हेंबर रोजी घेण्यात येत आहेत. या पदांच्या परीक्षांचे प्रवेशपत्र लिंक विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे.
शिक्षण आयुक्तांचे आदेश
18 व 19 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यातबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते. असे सांगत शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की या दोन्ही दिवशी शाळांना सुट्टी नसेल. शाळा नियमित सुरु राहणार आहेत, असे आदेश पत्राद्वारे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत.
18 व 19 नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक सुट्टी नाही.
मांढरे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 18 व 19 नोव्हेंबर रोजी कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही. अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी व अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील. तसेच ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद घ्यावी. कोणत्याही शाळा अनावश्यकरित्या बंद राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी असेही मांढरे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.