राज्यघटनेत हस्तक्षेप करण्याचा मोदींचा डाव जनतेने उधळून लावला : शरद पवार

म्हणाले- महिलांना पैसे देता त्याला विरोध नाही, पण सुरक्षेचे काय?, राज्यात परिवर्तनाची नितांत गरज

On
राज्यघटनेत हस्तक्षेप करण्याचा मोदींचा डाव जनतेने उधळून लावला : शरद पवार

Maharashtra Assembly Election 2024 :  महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे निवडणूक सभेला संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 31 जागा तुम्ही आम्हाला दिल्या आणि संविधान बदलण्याचा मोदींचा डाव आम्ही हाणून पाडला. परिणामी मोदींना चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या मदतीने सरकार बनवण्याची वेळ आली. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आपला विजय निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडी व महायुतींच्या नेत्यांमध्ये सद्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झालेल्या आहेत. 

जनतेमुळे मोदींचा मोठा प्लॅन हुकला

राष्ट्रवादीचे (SP) अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे सभा घेत मोदींवर पुन्हा निशाणा साधला. तर,  महाराष्ट्रातील लोकांची स्थिती सुधारण्यासाठी सरकारमध्ये बदल करणे आवश्यक आहे,  असे आवाहन त्यांनी केले. लोकसभा निवडणुकीत लोकांनी आम्हाला साथ दिल्याने मोदींचा संविधान बदलण्याचा डाव जनतेने हाणून पाडला, असेही त्यांनी आवर्जून सागंत मोदींवर निशाणा साधला. 

महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज- पवार

महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप आणि अजित पवार गटाच्या महायुती सरकारवर निशाणा साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, शेतकरी, महिला आणि तरुणांची स्थिती सुधारायची असेल, तर परिवर्तनाची नितांत गरज आहे. राज्यात आम्ही चांगल्यासाठी हातमिळवणी केली आहे पण बदल घडवून आणणे हे कोणा एका व्यक्तीचे काम नाही.


  

Advertisement

Latest News

भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे नालासोपारा विरारमध्ये पैसे वाटप करताना सापडल्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. थेट भाजपचा बडा नेता...
विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले- हा भाजपचा नोट जिहाद आहे का?
राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप