'व्होट जिहाद'वर वरुन देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमाणींचाही घेतला समाचार; काय म्हणाले-DCM
काँग्रेस जाती जातीमध्ये लोकांना विभाजित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमंशी बोलताना शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. सज्जात नोमाणी हे उलीमा कौन्सिलचे प्रमुख आहेत. त्यांनी त्यांच्या सतरा मागण्या महाविकास आघाडीकडे दिल्या आहेत. त्या मागण्या अतिशय भयानक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
RCC New
मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण द्या, 2012 ते 2024 महाराष्ट्र जेवढे दंगे झाले त्या दंग्यांमधील मुस्लिम समाजातील आरोपींवरील केसेस परत घ्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला, अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी केल्या आहेत. तर महाविकास आघाडीतील पक्षांनी या मागण्या मान्य करणार असल्याचे पत्र नोमाणी यांना दिले आहे. आणि त्याच मागण्या मान्य झाल्याने आता नोमाणी हे शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि राहुल गांधी हे आमचे सेनापती असल्याचे सांगत आहेत. तसेच ते नागरिकांना व्होट जिहाद करण्याचे आवाहन करत आहे. निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लांगुलचालन देशाच्या इतिहासात आम्ही पाहिले नव्हते. केवळ अल्पसंख्यांक समाजाची मते मिळवण्यासाठी या ठिकाणी विरोधी पक्ष, महाविकास आघाडी काम करत असेल तर त्या विरोधात निश्चितपणे आपल्या सर्वांना एक व्हावेच लागेल, असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीला इशारा
या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला इशारा देखील दिला. 'तुम्हाला वाटत असेल की मुठभर लोकांच्या मतांवर तुम्ही निवडून येऊ शकतात, तर बहुसंख्य मतांना देखील एकत्र यावेच लागेल. आज नोमणी यांचा दुसरा व्हिडिओ आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदान केलेल्या मुस्लिमांना शोधून, त्यांना वाळीत टाकण्याचे आवाहन केले आहे. त्यांचे दाणा पाणी बंद करण्याचे आवाहन केले आहे. मात्र कायम धर्मनिरपेक्षाची भाषा करणारे त्याबद्दल काहीही बोलत नाहीत. या विरोधात आम्ही निश्चितपणे उत्तर देणार असल्याचा इशारा देखील फडणवीस यांनी दिला आहे. इतकेच नाही तर एका पद्धतीने हा एक गुन्हा आहे. किरीट सोमय्या यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
आघाडीकडे मुद्दाच नाही
काँग्रेस जनतेला जाती जातीमध्ये विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर महाविकास आघाडी मुस्लिम समाजामध्ये पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्याकडे निवडणुकीसाठी मुद्दा उरला नाही. त्यांच्याकडे मुद्दाच नसल्याने केवळ जातीवाद करून व्होट जिहाद करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.