डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी मॉर्निंग वॉक करीत साधला नागरिकांशी संवाद

वॉकिंग करणाऱ्यांच्या जाणून घेतल्या समस्या; आमदार म्हणून नव्हे तर सर्वसामान्य म्हणून काम करेन - डॉ. अर्चनाताई !

On
डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी मॉर्निंग वॉक करीत साधला नागरिकांशी संवाद

लातूर / प्रतिनिधी : भाजपा महायुतीच्या लातूर शहर मतदार संघातील उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी बुधवारी सकाळी जिल्हा क्रीडा संकुल येथे मॉर्निंग वॉक करत तेथे वॉकिंग आणि व्यायामासाठी जमलेल्या लातूरकर नागरिकांशी संवाद साधला.

बदलत्या जीवनमानामुळे आरोग्य समस्यांमध्ये वाढ होत आहे.रक्तदाब,मधुमेह यासारखे आजार वाढत असल्याने ते टाळण्यासाठी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.स्वतः डॉक्टर असणाऱ्या अर्चनाताईंना आरोग्य विषयक समस्यांची जाण असल्याने अशा व्यक्तींची त्यांनी संपर्क व संवाद साधला.

WhatsApp Image 2024-11-13 at 7.40.38 PM

यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख  जाधव,भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर,आदिसह अनेक मान्यवर व  पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.बदलत्या जीवनशैलीत आजार होण्यापूर्वीच दक्षता घ्यावी. आजाराची लक्षणे दिसत असतील तर वेळीच उपचार घ्यावेत,असे सांगतानाच लातूर शहर मतदारसंघाला झालेल्या आजारावर उपचार करण्यासाठी दि.२०नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानात कमळाचे बटन दाबून आपल्याला विधानसभेत पाठवावे,असे आवाहनही डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी यावेळी बोलताना केले.

WhatsApp Image 2024-11-13 at 7.40.38 PM (1)

चहा आणि पोह्यांचा घेतला आस्वाद..

मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी संवाद साधल्यानंतर डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर क्रीडा संकुलाच्या बाहेर पडल्या. रस्त्याने जात असताना क्रीडा संकुलाच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या हॉटेल व्यवसायिकांचे अभिवादन स्वीकारत त्या पुढे जात होत्या.त्यापैकीच एकाने ताईंना पोहे खाण्याचा आग्रह केला असता ताईंना त्यांचा आग्रह मोडता आला नाही. पोह्याचा आस्वाद घेऊन पुढे जाताना आणखी एका हॉटेल मधून ताईंना चहाचाही आग्रह झाला.ताईंनी त्याचाही आस्वाद घेतला.आजवर गाडीच्या काचा बंद करून धुरळा उडवीत जाणारे लोकप्रतिनिधी अनुभवणाऱ्या लातूरच्या व्यवसायिकांसाठी हा अनुभव नवाच होता. अनेकांनी हे क्षण आपल्या मोबाईल मध्ये कॅमेराबद्ध करून घेतले.  

 

Advertisement

Latest News

अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात  अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
नागपूर : नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना सोमवारी...
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप 
कोणत्याही स्थितीत गद्दारांना गाडणार; सत्ताधाऱ्यांनी सरकारची तिजोरी लुटली; ठाकरेंची तोफ धडाडली
माझ्या जागेवर दुसरी आणली, हर्षवर्धन जाधवांवर आरोप करत संजना जाधव भर सभेत रडल्या
भारत लोकशाहीची जननी; नायजेरिया भेटीत पीएम मोदींचे प्रतिपादन