राज्यात थंडी वाढली; हिवाळ्यात कशी घ्याल आरोग्याची काळजी
हिवाळ्यात कोणत्या गोष्टी करायच्या अन् कोणत्या गोष्टी टाळायच्या!
Health Tips for Winter Take care of your health : राज्यात सगळीकडे आता थंडीला सुरुवात झालेली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात गारवा आणि सगळीकडे धुक्यांची चादर असते. तसेच या दिवसांमध्ये उन्हाच्या उकाड्यापासून आराम मिळतो. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
ऋतुमानात बदल झाला की नवीन आजार देखील तोंड वर काढू लागतात. शिवाय साथीचे आजारही येतात. थंडीला सुरूवात झाल्याने तुम्ही आता तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घ्या अन् स्वत:ला निरोगी ठेवा. यासाठी खाण्यापिण्यामध्ये व सवयीमध्ये बदल देखील करा. त्याचविषयी आज आपण या लेखामधून जाणून घेऊया....!
हिवाळ्यात कशी घेणार काळजी, जाणून घ्या खालील मुद्द्यातून..!
गरम अन्नपदार्थांचे सेवन करणे
थंडीच्या दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी किंवा इतर वेळी गरम अन्नपदार्थ जेवण्याचा प्रयत्न करावा. गरम आणि पौष्टिक अन्नपदार्थ खाल्यामुळे शरीराला योग्य ते पोषण मिळण्यास मदत होते. गरम पाणी, सूप, गरम दूध किंवा गरम अन्नाचे सेवन करावे. तसेच हिवाळ्यात जास्त बाहेरच्या पदार्थांचे सेवन केल्यास आजारी पडण्याची शक्यता असते.
उबदार कपड्यांचा करा वापर
हिवाळ्यामध्ये साथीचे आजार वाढण्याची शक्यता असते. तसेच रात्रीच्या वेळी वातावरणात थंडावा असतो. त्यामुळे रात्री झोपताना किंवा दिवसाच्या वेळी उबदार कपडे परिधान करावे. ज्यामुळे शरीराचे थंडीपासून नुकसान होणार नाही. शिवाय हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वेटर किंवा इतर थंडीपासून बचाव करणारे कपडे परिधान करावे.
सतत पाणी पित रहा
सर्वच ऋतूंमध्ये शरीर हायड्रेट ठेवणे फार गरजेचे आहे. उन्हाळ्यात जशी शरीराला पाण्याची आवश्यकता असते, तशीच आवश्यकता हिवाळ्यात सुद्धा असते. त्यामुळे पाण्याचे भरपूर सेवन करावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर आजारांपासून दूर राहते.
चादरीचा वापर करणे
थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्री झोपताना जाडसर चादर वापरावी. यामुळे सर्दी, खोकला किस्वा इतर आजार होणार नाहीत. हिवाळ्यात तापमान कमी होत जाते. कमी झालेल्या तापमानाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.
कुलरचा वापर टाळा, फॅनचा वेग कमी ठेवा
थंडीच्या दिवसांमध्ये कुलरचा वापर करू नये. यामुळे थंडी आणखीन वाढण्याची शक्यता असते. जास्त थंड वातावरणात राहिल्यामुळे सर्दी, खोकला, ताप आणि इतर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री झोपताना पंख्याच्या हवेचा वापर करावा. पण तापमानात घट झाल्यास पंखा किंवा कुलर वापरू नये.
(टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही, कृपया डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)