'CM म्हणजे कॉमन मॅन', आमची देण्याची वृत्ती अन् विरोधकांची फक्त खाण्याची प्रवृत्ती 

एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले- मी धनुष्यबाण सोडून आणला 

On
'CM म्हणजे कॉमन मॅन', आमची देण्याची वृत्ती अन् विरोधकांची फक्त खाण्याची प्रवृत्ती 

Maharashtra Assembly Election 2024 :  सीएम म्हणजे कॉमन मॅन असतो. तोच कॉमन मॅन म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून मी काम करत आहे. आमची देण्याची वृत्ती  आहे, अन् विरोधकांची केवळ खाण्याची प्रवृत्ती आहे, असा लोकांपासून सावध रहा, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी  महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केला.

जालना विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना येथे सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अर्जुन खोतकर यांची तुलना महाभारतातील अर्जुनासोबत केली, तर रावसाहेब दानवे यांना श्रीकृष्णाची उपमा दिली.  

मी धनुष्यबाण सोडून आणला 
 
जेव्हा अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार काम करत होते, समजू द्या लोकांना तुम्ही किती कामांना ब्रेक लावले. आमचे सरकार आल्यावर आम्ही सगळे ब्रेक काढून टाकले आणि विकासकामांना चालना दिली. अनेक मोठ्या प्रकल्पांना त्यांनी स्टे देण्याचे काम केले. तुम्ही बाळसाहेबांची शिवसेना तोडली, बाळासाहेबांना जे नको होते ते तुम्ही केले. कशासाठी? सत्तेसाठी. तुम्ही अनैसर्गिक युती केली खुर्चीसाठी. धनुष्यबाण तुम्ही कॉंग्रेसच्या दावणीला बांधला. मी तो सोडून आणला, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मराठवाडा कायम शिवसेनेचा लाडका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठवाडा कायम शिवसेनेचा लाडका राहिला आहे आणि मराठवाड्याचा एकच लाडका नेता राहिला आहे ते म्हणजे शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. अर्जुन खोतकर यांनी देखील त्यांची प्रेरणा घेत शिवसेना वाढवण्याचे अथक परिश्रम घेतले आहेत. अर्जुनाकडे चक्रव्यूव्ह भेदण्याची क्षमता आहे, त्याचा कोणी अभिमन्यू करू शकणार नाही. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना कृष्णाची उपमा दिली.

हा बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या मतदारसंघात पुन्हा एकदा श्रीकृष्णाचा, प्रभू श्रीरामाचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. काल कोणीतरी म्हणत होते आमचा धनुष्यबाण चोरला, हे काय खेळणं आहे का? लहान पोरासारखे माझं हे चोरलं ते चोरलं. हा बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे. हा धनुष्यबाण एकदा सुटला की कुठे लागेल काही सांगता येत नाही.

खोतकर माझ्या खांद्याला खांदा लाऊन उभा

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा, आनंद दिघेंचा एकनिष्ठ शिवसैनिक आहे. या एकनाथ शिंदेने प्रवाहाच्या विरोधात जाऊन लढा दिला आणि धनुष्यबाण सोडवून आणला. हा अर्जुन खोतकर सुद्धा माझ्यासोबत खांद्याला खांदा लाऊन उभा होता. तुम्ही सांगा जर हे सरकार आम्ही आणले नसते तर लाडकी बहीण सुरू झाली असती? मुलींना मोफत शिक्षण सुरू झाली असती? तीर्थदर्शन योजना सुरू झाली असती? उद्योग आले असते? गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागात सुद्धा आपण विकास प्रकल्प सुरू केले.

सीएम म्हणजे कॉमन मॅन

मी सर्वसामान्य मुख्यमंत्री आहे. सीएम म्हणजे कॉमन मॅन. मला सर्वसामान्य जनतेला पुढे न्यायचे आहे म्हणून मी या सगळ्या योजना आणल्या आहेत. लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये आपण देणार आहोत. जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण स्थिर ठेवणार आहोत. तरुणांना आपण विद्यावेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचा विचार करणारे हे सरकार आहे. शेतकऱ्यांना वीज मोफत केली आहे तसेच जनतेच्या वीज बिलमध्ये आपण 30 टक्के मोफत केले आहे.  

Advertisement

Latest News

भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे नालासोपारा विरारमध्ये पैसे वाटप करताना सापडल्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. थेट भाजपचा बडा नेता...
विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले- हा भाजपचा नोट जिहाद आहे का?
राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप