ICC कडून चॅम्पियन्स ट्रॉफी दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर; PoKतील शहरांचा समावेश नाही
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 3 शहरांचा केला होता समावेश; BCCI ने घेतला होता आक्षेप
आयसीसीने शनिवारी चॅम्पियन्स ट्रॉफी दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. यात पीओके शहरांचा समावेश नाही. यापूर्वी, पीसीबीने गुरुवारी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ट्रॉफी दौऱ्याचे वेळापत्रक पोस्ट केले होते. यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील 3 शहरांचाही समावेश आहे. यावर बीसीसीआयने आक्षेप घेतला होता. आजपासून इस्लामाबाद येथून ट्रॉफी दौऱ्याला सुरुवात झाली आहे.
PCBला 'या' ठिकाणी घ्यायचा होता दौरा
पीसीबीने गुरुवारी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ट्रॉफी दौऱ्यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. पीसीबीने लिहिले होते- 'दौऱ्याची सुरुवात 16 नोव्हेंबरपासून इस्लामाबाद येथून होईल. यानंतर अनेक शहरांमधून जात पीओकेमधील स्कार्दू, हुंजा आणि मुझफ्फराबाद येथेही जाईल.
एका सूत्राने वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी पीओकेमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी दौरा आयोजित करण्याच्या पीसीबीच्या घोषणेवर आक्षेप घेतला होता. शहा यांनी हा मुद्दा आयसीसीसमोर मांडला होता. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप होता कामा नये, असे ते म्हणाले होते.
Excitement for the upcoming Men's Champions Trophy 2025 builds up, as the Trophy Tour kicks off in Islamabad 🎉https://t.co/QfQJesYVRf
— ICC (@ICC) November 16, 2024
चॅम्पियन ट्रॉफी ग्लोबल टूरच्या तारखा
तारीख ठिकाण
16 नोव्हेंबर - इस्लामाबाद (PAK)
17 नोव्हेंबर - तक्षशिला आणि खानापूर (PAK)
18 नोव्हेंबर - अबोटाबाद (PAK)
19 नोव्हेंबर - मुरी (PAK)
20 नोव्हेंबर - नाथिया गली (PAK)
22-25 नोव्हेंबर - कराची (PAK)
26-28 नोव्हेंबर - अफगाणिस्तान
10-13 डिसेंबर - बांगलादेश
15-22 डिसेंबर - आफ्रिका
25 डिसेंबर-5 जानेवारी - ऑस्ट्रेलिया
6-11 जानेवारी - न्यूझीलंड
12-14 जानेवारी - इंग्लंड
15-26 जानेवारी - भारत
27 जानेवारी - इव्हेंट स्टार्ट (PAk)