शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे खूप गरजेचे; मनमोहनसिंगांच्या काळातील किस्सा सागंत पवारांनी सभा गाजवली

हिंगणघाट येथे शरद पवारांनी केला मोदी-शहांवर निशाणा; राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी

On
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे खूप गरजेचे; मनमोहनसिंगांच्या काळातील किस्सा सागंत पवारांनी सभा गाजवली

युपीएचे सरकार असताना शेतकऱ्यांना 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर झाली होती. ही कर्जमाफी कशी मिळाली, त्यासाठी काय केले, याबाबतचा किस्सा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितला. मी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव दिला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत बातम्या आल्या होत्या. त्यानंतर मी मनमाहेन सिंग यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत चर्चा केली. त्यानंतर ही कर्जमाफी देण्यात आली, असे शरद पवार यांनी सांगितले.

वर्ध्यातील हिंगणघाट येथे आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. शेतमालाला भाव भेटत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. त्याआधी यूपीए सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी 70 हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. त्यावर शरद पवार यांनी भाष्य केले.

शरद पवार म्हणाले, मी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत मनमोहन सिंग यांची भेट घेऊन चर्चा केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे किती आवश्यक आहे, ते मनमाहेन सिंग यांना समजावून सांगितले. त्यानंतर मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांना 70 हजार कोटी रुपये कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला.

मोदींनी लोकांचे प्रश्न सोडवले नाहीत

शरद पवार यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला. ते म्हणाले, सध्या नरेंद्र मोदी यांच्या हातात सत्ता असून त्याचा वापर कसा केला, हे सर्वांना माहीत आहे. मोदी यांनी या दहा वर्षांच्या काळात लोकांचे प्रश्न सोडवले नाही. देशात 115 कोटी लोकांसाठी धोरणे करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना लागणारी खते, औषधी महाग झाली आहेत. शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. पण शेतमालाला योग्य भाव दिला जात नाही. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीमधून आता निकाल द्यायचा आहे.

निवडणुकीनंतर लोकप्रिय योजना बंद होणार

सरकारने काढलेल्या लोकप्रिय योजना फक्त निवडणुकीसाठी आहे. मतदान संपल्यावर लाडकी बहीण, शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना बंद होणार आहे, असा दावा शरद पवार यांनी यावेळी केला. पुढे बोलताना शरद पवार यांनी पाच गोष्टींची गॅरंटी सांगितली आहे. महिलांना 3 हजार रुपये, महिलांसाठी एसटीचा मोफत प्रवास, शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांचे कर्ज माफ, जातीय जनगणना, आरक्षणाची 50 टक्के मर्यादा हटवणार, बेरोजगारांना महिन्याला 4 हजार रुपये देण्याची गॅरंटी जाहीर केल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Tags:

Advertisement

Latest News

भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे नालासोपारा विरारमध्ये पैसे वाटप करताना सापडल्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. थेट भाजपचा बडा नेता...
विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले- हा भाजपचा नोट जिहाद आहे का?
राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप