मोठी बातमी : लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोल्हापुरात घोषणा 

विकासाचे मारेकरी म्हणून महाविकास आघाडीची इतिहासात नोंद, शिंदेंचा विरोधकांवर निशाणा 

On
मोठी बातमी : लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोल्हापुरात घोषणा 

कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापूरमधील प्रचार सभेत महायुतीच्या 10 वचनांची घोषणा केली. यामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेत 15000 रुपये, प्रत्येकाला अन्न आणि निवारा, वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपये, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार, 25 लाख रोजगार देणार, 45000 पांदण रस्ते बांधणार, अंगणवाडी, आशा सेविकांना 15000 रुपये वेतन, वीज बिलात 30 टक्के कपात आणि 100 दिवसांत व्हिजन महाराष्ट्र 2019 सादर करणार अशी गेमचेंजर वचने मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महायुतीकडून कोल्हापूरात आज प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. 

या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठा आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदी, ड्रोन दिदी अशा योजना राबवल्या. डबल इंजिनचे सरकार आहे. आम्ही दिल्लीत जातो ते राज्यातील अनेक योजनांसाठी निधी आणण्यासाठी जातो. राज्याच्या विकासासाठी पैसे मागतो पण काहीजण दिल्लीत जातात मुख्यमंत्री करा, चेहरा बनवा यासाठी जातात मात्र महाविकास आघाडीला जो चेहरा नकोय ते महाराष्ट्राला कसा चालेल, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उबाठाला लगावला. 

देंवेंद्रजींनी सुरु केलेली जलयुक्त शिवार योजना बंद केली त्याची चौकशी लावली. महाविकास आघाडीने मेट्रो बंद पाडली, अटल सेतूचे काम रोखले, कोस्टल रोडचे काम बंद केले. आम्ही सर्व प्रकल्प सुरु केले आणि पूर्ण केले, असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड सादर केले. त्यासाठी हिंमत लागते आणि काम कराव लागते, असे ते म्हणाले. अडीच वर्षात मविआने केवळ ४ सुप्रमा दिल्या होत्या, महायुतीने दोन वर्षात सिंचनाच्या १२४ सुप्रमा दिल्या आणि लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री सहायता निधीमधून दोन वर्षात ३५० कोटी वाटले आणि एक लाख नागरिकांचे प्राण वाचले, असे ते म्हणाले. 

आधीच्या सरकारमध्ये तुम्ही मुख्यमंत्री असताना मंदिर बंद होती, मंदिरे सुरु करण्यासाठी आंदोलनं करावी लागली, असा टोला त्यांनी उबाठाला लगावला. विकासाचे मारेकरी म्हणून महा आघाडीची इतिहासात नोंद होईल, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. पंचगंगेच्या महापूरावर कायमस्वरुपी योजना करण्यासाठी ३२०० कोटींची योजना सरकारने आणली आहे. महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आणण्यासाठी कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा असला पाहिजे. येत्या २३ तारखेला छोट्या मोठ्या लवंग्या ऐवजी अँटम बॉम्ब फोडायचा आहे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

Tags:

Advertisement

Latest News

भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे नालासोपारा विरारमध्ये पैसे वाटप करताना सापडल्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. थेट भाजपचा बडा नेता...
विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले- हा भाजपचा नोट जिहाद आहे का?
राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप