अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात
सोमवारी रात्री कारवर झाली होती दगडफेक; वाचा संपूर्ण प्रकरण
नागपूर : नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली चार अज्ञातांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली. डोक्याला मार लागल्याने अनिल देशमुख यांना तातडीने काटोल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
RCC New
नरखेड गावात सभेतून परतत असताना रात्री आठच्या सुमारास हा हल्ला झाला होता. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी ही घटना घडली. दरम्यान, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने करण्यात आली.
तत्काळ कारवाईची मागणी
या हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त करताना आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी ट्विटरवर लिहिले की, "महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला धक्कादायक आहे. आपल्या राजकारणात किंवा समाजात हिंसेला स्थान नाही. आम्ही अधिकाऱ्यांना गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करण्याची विनंती करतो.
आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही हिंसाचाराचा निषेध केला आणि लोकशाही समाजात अशा घटना घडू नयेत यावर भर दिला. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी या हल्ल्यावर टीका केली आणि हे महाराष्ट्रातील अराजकतेचे लक्षण असल्याचे म्हटले आणि देशमुख यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली.
पोलिसांची घटनास्थळी तत्काळ भेट
या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली. तांत्रिक पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी भेट दिली. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पोद्दार यांच्या वक्तव्यानुसार तपास काटोल डेप्युटी एसपीकडे सोपवण्यात आला आहे. या घटनेबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अनिल देशमुख यांचे पुत्र मैदानात
दरम्यान, अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख हे काटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) बॅनरखाली भाजपचे चरणसिंह ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.