288 जागांसाठी राज्यभरात किती उमेदवार रिंगणात! 

किती उमेदवारांनी घेतली माघार, वाचा एका क्लिकर सविस्तर

On
288 जागांसाठी राज्यभरात किती उमेदवार रिंगणात! 

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आता दिवसेंदिवस रगत चढत चाललेली आहे. यंदाची निवडणुक जो कोणी उमेदवार निवडून येणार त्याचे नशीबच बलवत्तर अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याचे कारण देखील तसेच आहे. प्रमुख सहा पक्ष, दोन आघाड्या अन् अपक्ष उमेदवारांची संख्या पाहता, यंदाची लढाई ही कोणत्याही उमेदवाराला सोपी नाही. 

सोमवारी अर्थात 4 नोव्हेंबर रोजी तीन वाजता अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आता राज्यभरात किती उमेदवार मैदानात उतरलेले आहेत. तर किती जणांनी आज दिवसभरात अर्ज माघारी घेतले याची आकडेवारी समोर आली आहे. 

8,272 उमेदवार मैदानात 

निवडणूक आयोगाकडून दिलेल्या माहितीनुसार,  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी एकूण १०,९०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १६५४ उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले, तर ९२६० उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यापैकी ९८३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. या सर्व प्रकारानंतर आता ८२७२ उमेदवार उरले असून २० नोव्हेंबरला कोणाच्या भवितव्याचा फैसला ईव्हीएममध्ये होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मविआ-महायुतीचे नेते अडचणीत 

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे, तर त्याचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. याबाबत सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याचबरोबर काही बंडखोर उमेदवारही अगम्य झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते चांगलेच अडचणीत आले आहेत. यात काहींनी अर्ज मागे घेतले तर काहींनी कायम ठेवले आहेत. यामुळे दोन्ही आघाड्यांसमोर आव्हान उभे राहिलं आहे.


 

Advertisement

Latest News

भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे नालासोपारा विरारमध्ये पैसे वाटप करताना सापडल्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. थेट भाजपचा बडा नेता...
विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले- हा भाजपचा नोट जिहाद आहे का?
राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप