आमच्यात वाद झाले तर मुख्यमंत्रीपदासाठी तैय्यार; रामदास आठवलेंचा दावा

म्हणाले- जरांगेंची भूमिका योग्य, त्यांना आता राजकारण कळू लागले

On
आमच्यात वाद झाले तर मुख्यमंत्रीपदासाठी तैय्यार; रामदास आठवलेंचा दावा

आमच्यामध्ये वाद झाले तर तर मुख्यमंत्री पदासाठी मी तयार आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे.

रामदास आठवले म्हणाले, मनोज जरांगेंची भूमिका योग्य, त्यांना आता राजकारण कळू लागले आहे. काही वेळा दोन पावले मागे यावे लागते. मनसे महायुतीमध्ये नाही, त्यांनी काही उमेदवार उभे केले आहेत. भाजप आणि मनसेमध्ये अंडरस्टॅडिंग आहे. मनसेचा युतीला फायदा होणार आहे. मुख्यमंत्री महायुतीचा होणार या राज ठाकरेंच्या मताशी सहमत आहे. आमच्यात वाद होणार नाही. केंद्रीय नेते आणि आम्ही निर्णय घेऊ. कोणात वाद झाले तर मुख्यमंत्री पदासाठी मी तयार आहे, असे त्यांनी थेट सांगितले आहे.

गरीब मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, आरपीआयच्या मतांचा महायुतीला फायदा झाला आहे. हरियाणामध्ये लोकसभेला कमी जागा आल्या, मात्र विधानसभेला जास्त जागा आल्या. आमचा आत्मविश्वास वाढला आहे. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत. तसेच मराठा समाजाच्या मागे सरकार उभे आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे, असे देखील आठवले यावेळी म्हणाले.

कोणाला ओबीसी म्हणायचे हे केंद्र ठरवेल 
मनोज जरांगे यांच्याविषयी बोलताना रामदास आठवले म्हणाले, जरांगे फॅक्टर चालणार नाही. मराठा समाजाच्या मागे सरकार उभे आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे, पण केंद्राने आर्थिक 10 टक्के आरक्षण दिले आहे. मनोज जरांगे यांची मागणी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची आहे. सर्व मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देणे शक्य नाही. तसेच कोणाला ओबीसी म्हणायचे हा सर्वस्वी अधिकार केंद्राचा आहे, असेही रामदास आठवले यांनी स्पष्ट सांगितले आहे.

कार्यकर्त्यांनी बंडखोरांच्या मागे उभे राहू नये
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदा होणार आहे. राज ठाकरेंनी आपले उमेदवार उभे केले त्याचा फायदाही आम्हाला होणार आहे. राजू शेट्टी, संभाजीराजे यांच्या आघाडीचा देखील आम्हाला फायदा होणार असल्याचे आठवले म्हणाले. तसेच आमच्या पक्षाला 4 ते 5 जागा मिळायला पाहिजे होत्या, मात्र एकच जागा देण्यात आली आहे. तरीही कार्यकर्त्यांनी बंडखोरीच्या मागे उभे राहू नये.

Tags:

Advertisement

Latest News

भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे नालासोपारा विरारमध्ये पैसे वाटप करताना सापडल्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. थेट भाजपचा बडा नेता...
विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले- हा भाजपचा नोट जिहाद आहे का?
राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप