राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
डहाणूत भाजपने डाव साधला; बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा थेट भाजपला पाठिंबा
uresh Padvi join BJP : एकीकडे विनोद तावडे यांनी मतदारांना पैसे वाटले असा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. विरारमध्ये थरार रंगला होता. त्यामुळे भाजपचा कारनामा पुढे आल्याचा आरोप होत असतानाच बहुजन विकास आघाडीला तिकडे डहाणूमध्ये मोठा धक्का बसला आहे.
RCC New
बहुजन विकास आघाडीचे डहाणू विधानसभेचे उमेदवार सुरेश पाडवी (Suresh Padvi) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुरेश पाडवी बहुजन विकास आघाडीचे पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना डहाणू विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती . मात्र, उद्या मतदान असतानाच त्यांनी आजच भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
सुरेश पाडवींचाल विनोद मेढा यांना पाठिंबा
दरम्यान, सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच भाजपाचे डहाणू विधानसभेचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे सगळी राजकीय समीकरणं बदललली आहेत. सुरेश पाडवी यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याशी चर्चा करून अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला अन् भाजपला पाठिंब्याची घोषणा केली.
विरारमध्ये तावडेंना घेरलं
एका बाजुला पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याच्या आरोपाचं प्रकरण सुरु होते. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही आरोप केला होता. विनोद तावडे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलला शेकडो कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. यामुळे बराच काळ गदारोळ झाला. त्यानंतर पोलिसांनी विनोद तावडे यांना सुरक्षित बाहेर काढले आहे. हॉटेलमध्ये 9 लाखांची रोकड जप्त करण्यात आली.