उद्या 288 जागांसाठी मतदान; किती उमेदवार, मतदार किती, वाचा एका क्लिकवर सविस्तर

On
उद्या 288 जागांसाठी मतदान; किती उमेदवार, मतदार किती, वाचा एका क्लिकवर सविस्तर

Maharashtra Assembly Election 2024 :  महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूटीनंतरही ही निवडणूक महत्त्वाची आहे.  तर यंदाच्या निवडणुकीत एकूण 158 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.   

RCC New

RCC New

महायुती Vs मविआ अशी थेट लढत

शिंदे गटातील शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील महायुतीचा भाग आहेत. तर काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) हे महाविकास आघाडीचा भाग आहेत.

किती टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल

29% उमेदवार कलंकित, 412 विरुद्ध खून-बलात्कारसारखे गंभीर गुन्हे दाखल निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, अपक्षांसह विविध पक्षांचे एकूण 4136 उमेदवार रिंगणात आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (ADR) ने यापैकी 2201 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी करून अहवाल तयार केला आहे. त्यानुसार जवळपास 29 टक्के म्हणजेच 629 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यापैकी 412 जणांवर खून, अपहरण, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 50 उमेदवारांवर महिलांशी संबंधित गुन्ह्यांचे आरोप आहेत.

आकडे काय सांगतात? 

प्रमुख पक्ष आणि उमेदवार
भाजप: 149 जागा
शिवसेना (शिंदे गट): 81 जागा
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : 59 जागा
-----------

काँग्रेस : 101 जागा
शिवसेना (उद्धव गट): 95 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): 86 जागा
बसपा : 237 उमेदवार रिंगणात
AIMIM: 17 उमेदवार
--------

एकूण उमेदवार: एकूण 4,136 
अपक्ष उमेदवार : 2,086 अपक्ष 
दीडशेहून अधिक जागांवर बंडखोर उमेदवार आपल्याच पक्षाविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.

मतदान केंद्रात मोठी वाढ 

2024 मध्ये एकूण 1,00,186 मतदान केंद्रे

2019 च्या निवडणूकीत काय झालं होत? 

गेल्या विधानसभा निवडणुकीत (सन-2019) भाजप-शिवसेनेची युती झाली होती. तेव्हा भाजपने 105, तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 44, तर राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या आहेत. भाजप-शिवसेना सहज सत्तेवर येऊ शकले असते, पण युती तुटली.

सर्व राजकीय गोंधळानंतर 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, मात्र बहुमत चाचणीपूर्वीच 26 नोव्हेंबरला दोघांनाही राजीनामा द्यावा लागला.

यानंतर 28 नोव्हेंबर 2019 रोजी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

सुमारे अडीच वर्षांनंतर शिवसेनेत, तर वर्षभरानंतर राष्ट्रवादीत बंडखोरी होऊन दोन्ही पक्ष चार पक्षांत विभागले गेले. या राजकीय पार्श्वभूमीवरच लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना आघाडी मिळाली.

Advertisement

Latest News

29 वर्षांची लग्नगाठ सुटली, ज्येष्ठ संगीतकार एआर रहमान यांचा संसार तुटला 29 वर्षांची लग्नगाठ सुटली, ज्येष्ठ संगीतकार एआर रहमान यांचा संसार तुटला
संगीतकार ए आर रहमान यांचा संसार तुटला आहे. त्यांच्या पत्नी सायरा रहमान यांनी पतीपासून  विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे....
मतदानाला जाताना 'या' गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा, नाही तर तुम्हाला होईल त्रास..!
उद्या 288 जागांसाठी मतदान; किती उमेदवार, मतदार किती, वाचा एका क्लिकवर सविस्तर
भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल
विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले- हा भाजपचा नोट जिहाद आहे का?
राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात