क्राईम पेट्रोल आणि सावध इंडिया सुप्रसिद्ध अभिनेते नितीन चौहान यांचे निधन

कुटुंबियांनी मृतदेह नेला अलीगढला; आत्महत्या केल्याचा सह कलाकारांचा दावा

On
क्राईम पेट्रोल आणि सावध इंडिया सुप्रसिद्ध अभिनेते नितीन चौहान यांचे निधन

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेते नितीन चौहान यांचे निधन झाले. 35 वर्षीय अभिनेत्याच्या मृत्यूच्या कारणाविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र त्याच्या सहकलाकाराने म्हटले आहे की अभिनेत्याने आत्महत्या केली आहे.

नितीन चौहान अलीगढचे रहिवासी होते, ते गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहत होते. नितीनचा गुरुवारी ७ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली, त्यानंतर त्यांनी मुंबई गाठून त्याचा मृतदेह अलीगडला नेला.

नितीनच्या निधनाची बातमी समजताच टीव्ही अभिनेत्री विभूती ठाकूरने त्यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले आहे, तुमच्या आत्म्याला शांती लाभो.विभूती ठाकूर यांच्या पोस्टवरून, नितीन चौहान यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात असला तरी त्यांच्या मृत्यूचे कारण अधिकृतरित्या दुजोरा मिळालेला नाही.

नितीन चौहान 'दादागिरी 2' चा रिॲलिटी शो विजेता बनून प्रसिद्ध झाला. पुढे, त्याने दूरदर्शनच्या 'जिंदगी डॉट कॉम' या टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर, तो 2012 मध्ये MTV स्प्लिट्सविला सीझन 5 चा भाग बनला, ज्यामध्ये त्याने अली गोनी आणि पारस छाबरा यांच्यासोबत भाग घेतला. नितीन अली गोनीला पराभूत करत शोचा उपविजेता ठरला, तर पारस छाबरा विजेता ठरला.

नितीन चौहानला स्प्लिट्सव्हिला-5 मधून खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर, तो क्राईम पेट्रोल, गुमराह, फ्रेंड्स कंडिशन अप्लाय, सावध इंडिया यांसारख्या टीव्ही शोचा भाग होता. तेरा यार हूं मैं या टीव्ही शोमध्ये तो शेवटचा दिसला होता.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, नितीन चौहान लवकरच त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करणार होता. मात्र, आठवड्याभरापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Tags:

Advertisement

Latest News

भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे नालासोपारा विरारमध्ये पैसे वाटप करताना सापडल्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. थेट भाजपचा बडा नेता...
विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले- हा भाजपचा नोट जिहाद आहे का?
राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप