अभिनेत्री आथिया शेट्टी अन् क्रिकेटर केएल राहुल होणार आई-बाबा

अथियाने दिली सोशल मीडियावर माहिती; दीड वर्षांपूर्वी झाले होते लग्न 

On
अभिनेत्री आथिया शेट्टी अन् क्रिकेटर केएल राहुल होणार आई-बाबा

Athiya Shetty- KL Rahul : अभिनेत्री अथिया शेट्टीने चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे.  क्रिकेटर केएल राहुल  आणि अथिया शेट्टी आई बाबा होणार आहेत. अथियाने प्रेग्नेंसीची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. हे कपल लग्नाच्या दीड वर्षानंतर त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे.

अलिकड्च्या काळात अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. यामध्ये दीपिका पदुकोण-रणवीर सिंह, रिचा चढ्ढा-अली फजल यांसह अनेक सेलिब्रिटी कपल्सचा समावेश आहे. आता आणखी एका सेलिब्रिटी कपलने गूड न्यूज दिल्याने चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

दीड वर्षांपूर्वी झाले होते लग्न 
भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि त्याची पत्नी अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी गोड बातमी शेअर केली. हे जोडपं लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी आतुर आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी सोशल मीडियावर गूड न्यूज शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचं जानेवारी 2023 मध्ये लग्न झालं. आता दीड वर्षाच्या सुखी संसारानंतर दोघेही पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. 

राहुल बऱ्याच दिवसांपासून फॉर्ममध्ये नाही

न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात केएल राहुल शून्यावर बाद झाला, तर दुसऱ्या डावात त्याने १२ धावा केल्यानंतर विकेट गमावली. मात्र, त्याने बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावले. मात्र तेव्हापासून तो बॅटने सतत आउट ऑफ फॉर्म आहे. अशा स्थितीत ही आनंदाची बातमी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीलाही नवे वळण आणू शकते.

Tags:

Advertisement

Latest News

भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे नालासोपारा विरारमध्ये पैसे वाटप करताना सापडल्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. थेट भाजपचा बडा नेता...
विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले- हा भाजपचा नोट जिहाद आहे का?
राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप