शहा यांचा हल्लाबोल, म्हणाले- बाळासाहेब ठाकरे यांचे गुणगान कोणी काँग्रेस नेता करू शकतो का?
अमित शहांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा; शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या देणार!
Maharashtra Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी आपला जाहीरनामा (संकल्प पत्र) प्रसिद्ध केला. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 25 लाख नोकऱ्या, महाराष्ट्राचा संपूर्ण विकास, शेतकऱ्यांसाठी हमीभावाची गॅरंटी, कर्जमाफी आणि महिलांना 2100 रुपये देण्याचा आम्ही संकल्प केल्याचे सांगितले.
या संकल्पपत्राच्या प्रसिद्धीवेळी केंद्रीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी महाराष्ट्रातील जनतेला सलग तिसऱ्यांदा महायुती सरकारला जनादेश देण्याची विनंती करतो. वीर सावरकरांचे नाव कोणत्याही काँग्रेस नेत्याने घेतले का? बाळासाहेब ठाकरे यांचे गुणगान कोणी काँग्रेस नेता करू शकतो का? राहुल गांधींनी वीर सावरकरांसाठी दोन चांगले शब्द काढून दाखवावे, असे म्हणत त्यांनी कॉंग्रेस नेत्यांवर हल्लाबोल चढवला.
महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 प्रमुख आश्वासने
- लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये प्रति महिना केली जाईल.
- पोलिस डिपार्टमेंटमध्ये 25 हजार महिला पोलिसांची भरती होणार.
- शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ केले जाईल. MSP वर 20% सबसिडी दिली जाईल.
- शेतकरी सन्मान योजनेची रक्कम 12 हजार रुपयांवरून 15 हजार रुपये करण्यात येणार.
- अन्न व निवारा योजनेंतर्गत गरजू व्यक्तीला अन्न व निवारा देण्याचे आश्वासन.
- ज्येष्ठ नागरिकांचे निवृत्ती वेतन 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्यात येणार आहे.
- जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवल्या जातील.
- दरमहा 25 लाख नोकऱ्या, 10 लाख विद्यार्थ्यांना महिन्याला 10 हजार रुपये शिक्षण शुल्क देण्याचे आश्वासन.
- 45 हजार गावांमध्ये रस्ते बांधणीचे आश्वासन, वीज बिलात 30 टक्के कपात, सौरऊर्जेवर भर.
- अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मासिक मानधन 15,000 रुपये आणि आरोग्य आणि सुरक्षा कवच देण्याचे आश्वासन.