योगी आदित्यनाथ यांच्यासमोरच नवनीत राणांचा ओवैसींवर हल्लाबोल
म्हणाल्या- तुझ्या घडाळीमध्ये 15 मिनिट तर माझ्या घड्याळमध्ये फक्त 15 सेकंद
अमरावती : महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरूवात झालेली आहे. या निवडणुकीत देखील विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर जोरदार निशाणा साधत आहेत.
अशातच अमरावती विधानसभा मतदासंघातील महायुतीच्या प्रचारसभेतून माजी खासदार नवनीत राणा यांनी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसींवर जोरदार हल्लाबोल चढवला. ओवैसी जर 15 मिनिटांचा इशारा देत असेल तर त्याला मी सांगते की, माझ्याकडे केवळ 15 सेकंद आहे, असा इशारा देत राणा यांनी जोरदार हल्लाबोल चढवला.
युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावतीमध्ये भाजप उमेदवारांसाठी प्रचारसभा होत असून भाजप नेत्या नवनीत राणा यांनी येथील व्यासपीठावरुन पुन्हा एकदा एमआयएमचे नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसींवर पलटवार केला आहे.
15 मिनिटांचा ओवैसीकडून पुर्नउच्चार
अकबरुद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा 15 मिनिटांचा पुर्नउच्चार केला. ओवैसी यांनी प्रचाराच्या त्यांच्या पहिल्या भाषणात वेळेचा उल्लेख करताना ते म्हणाले, 10 वाजताची वेळ आहे. आता 9.45 वाजतायत. अजून 15 मिनिट उरले आहेत. सभेला आलेल्या लोकांना ते म्हणाले, अरे भाई.. 15 मिनिट उरले आहेत. संयम ठेवा. ना मी त्यांचा पिच्छा सोडणार ना ते माझा सोडणार... चल रही है मगर क्या गूंज है." असं अकबरुद्दीन म्हणाले होते.
राणांनी ओवैसींना काय दिला इशारा?
भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणाने पुन्हा एकदा ओवैसींवर हल्लाबोल केला आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकांवेळी त्यांनी हैदराबादमध्ये जाऊन ओवैसींवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर, आता योगी आदित्यनाथ यांच्यासमोर भाषण करताना अकबरुद्दीन ओवैसींना इशारा दिलाय. ''तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद बाकी आहेत, असे म्हणत माजी खासदार व भाजप नेत्या नवनीत राणांनी अकबरुद्दीन ओवैसींना इशारा दिला आहे.
एमआयएमचे 16 जागांवर उमेदवार
AIMIM प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवेसी हे सलग 6 वेळा तेलंगणातील चंद्रयांगुट्टा येथून आमदार आहेत. एमआयएम महाराष्ट्रात 16 जागांवर निवडणुक लढवत आहे. त्यासाठी आता एमआयएमने त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. औरंगाबाद पूर्वचा प्रचार करण्यासाठी ते मंगळवारी रात्री छत्रपती संभाजीनगर शहरात होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये MIM ने महाराष्टात 44 उमेदवार उभे केले होते. त्यातील दोन जागांवर ते निवडून आले होते.