बंडखोरांची माघार होताच अखेर असा ठरला महाविकास आघाडीचा अंतिम फॉर्म्यूला !
जाणून घ्या- काँग्रेस, शरद पवार गट अन् ठाकरे गटाचे उमेदवार किती ठिकाणी
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीतून अनेक बंडखोर नेत्यांनी माघार घेतल्याने आता महाविकास आघाडीचा अंतिम फॉर्मुला समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी राज्यात 288 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
त्यातील 287 जागांवर महाविकास आघाडीने उमेदवार दिले असताना उत्तर कोल्हापूरच्या जागेवर मात्र ऐनवेळी काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने त्या ठिकाणी अपक्ष उमेदवाराला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.
कॉंग्रेसचे 101 जागांवर उमेदवार
राज्यभरातील लढवण्यात येणाऱ्या 288 जागांमध्ये काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष असून 101 जागांवर काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार दिले आहेत. तर त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने 92 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 86 जागांवर उमेदवार दिले आहेत.
मित्रपक्षाला 8 जागा सोडल्या
त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये 8 जागा या मित्र पक्षांसाठी सोडण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला तीन जागा सोडण्यात आल्या असून, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सुद्धा तीन जागा देण्यात आले आहेत. तर महाविकास आघाडीने दोन जागा समाजवादी पार्टीला दिल्या आहेत.
मुंबईत ठाकरे गट मोठा भाऊ
मुंबईत शिवसेना ठाकरे गट एकूण 22 जागांवर निवडणूक लढणार आहे. तर काँग्रेस पक्ष हा 11 जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष हा 2 जागांवर, समाजवादी पार्टी एक जागेवर निवडणूक लढवणार आहे.
असा असेल फॉर्म्यूला : 101-92-86-अन्य 9
काँग्रेस -101 + 1 ( कोल्हापूर उत्तर अपक्ष पाठिंबा) - 102
शिवसेना ठाकरे गट - 92
राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष - 86
शेकाप - 3
समाजवादी पक्ष - 2
माकप - 3
एकूण -288