काँग्रेस ओबीसींचा द्वेष करते; जातीजातीत भांडण लावते; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
धुळ्यानंतर नाशिकमध्ये घेतली प्रचारसभा; मविआवर देखील साधला निशाणा
नाशिक : म्हणाले की, काँग्रेस आणि घटकपक्ष असेल तर घोटाळेच होणार आहे. राज्यात तुम्ही यांना पापं करु देणार का? संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलं आहे, ती ऑल इंडिया नाही, ती परजीवी आहे. पायघड्यांवरच ती जिवंत आहे. बिहार, झारखंड अशा राज्यात दुसऱ्यासोबतच निवडणुका लढत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही जनतेसमोर आपली कामं दाखवत निवडणुकीत जात असतो मात्र काँग्रेसकडे आता एकच पर्याय आहे. काँग्रेसची खोटं बोलण्याची दुकान आहे. काँग्रेस आणि चेल्यांनी हे दुकान महाराष्ट्रात लावलंय. कर्नाटक, हिमाचलमध्ये हेच केलं आणि तिथे काय झालं? निवडणुका संपल्या आणि दुकान बंद झालं तेव्हा केलेल्या गोष्टी पूर्ण नाही झाल्या. सरकार चालवण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. जनतेवर कर लादला जातोय. जनता यांची खरी खोटी जाणते.
नरेंद्र मोदी म्हणाले की, महायुतीचं घोषणापत्र एका बाजूला आणि दुसरीकडे मविआचे घोटाळा पत्र आहे. काँग्रेस आणि घटकपक्ष असेल तर घोटाळेच होणार आहे. राज्यात तुम्ही यांना पापं करु देणार का? संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलं आहे, ती ऑल इंडिया नाही आहे ती परजीवी आहे. पायघड्यांवरच ती जीवंत आहे. बिहार, झारखंड अशा राज्यात दुसऱ्यासोबतच निवडणुका लढत आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी काँग्रेसने आपला हत्यार चालवलं आहे. एससी, एसटी ओबीसींची एकता तोडा आणि राज्य मिळवा, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
महायुती आहे तर राज्याची गती आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकला माझा नमस्कार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पहिल्या दिवशी मला नाशकात येण्याचे सौभाग्य मिळाले. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा आधी 11 दिवसांच्या अनुष्ठानाची माझी सुरुवात नाशिकमधून झाली होती. काळाराम मंदिरात मला सेवेचा लाभ मिळाला. विकसित महाराष्ट्र, भारतासाठी नाशिकचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. मी पाहतोय नाशकात जनसमूह, महाराष्ट्र बोलतोय भाजप महायुती आहे तर गती आहे, राज्याची प्रगती आहे.
डबल इंजिनमध्ये डबल विकास
महाराष्ट्र विकास करतोय. देश नवे रेकोर्ड बनवतोय. देशात गरिबांची चिंता करणारं हे सरकार आहे. गरीब पुढे जातो तेव्हा देश पुढे जातो. काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी गरीबी हटाओचा नारा दिला. मात्र, लोकांच्या पदरी काही पडलं नाही. 10 वर्षात 25 कोटी लोकं गरिबीतून बाहेर आले आहेत. हे शक्य झालं कारण मोदी की नियत सही है. मोदी सेवक बनून काम करतो. हे शक्य झालं कारण गरीबी विरोधातली लढाई सर्वांनी लढली. 50 लाखाहून अधिक महिलांना उज्ज्वला योजनांचे गॅस कनेक्शन आहेत. नल-जल सुविधा मिळाली आहे. 7 कोटी लोकांना अन्नधान्य मिळतंय. गरिबांसाठी चांगले काम होत आहे, ही कामे पुढे सुरु ठेवण्यासाठी महायुती सरकार बनवणं गरजेचं आहे. डबल इंजिनमध्ये विकास डबल होतो. पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळतोय. वर्षाला 12 हजार रुपयांची मदत मिळत आहे. महाराष्ट्रात पुन्हा सरकार स्थापन होणार तेव्हा ही मदत 15 हजार रुपयांची केली जाणार आहे.
नाशिक सशक्त भारतात महत्त्वाची भूमिका बजावतोय
सोयाबीन कापूस आणि दूध उत्पादकांना देखील मदत केली गेली आहे. देशाचा रुपया विदेशात गेला तो आता शेतकऱ्यांना मिळतोय त्यांना जातोय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना समजतो, धोरण आपण बदलली आहेत. महाराष्ट्र वेगानं पुढे जाणं गरजेचं आहे. महाराष्ट्र पुढे जाईल तेव्हा देश पुढे जाईल. मागील अडीच वर्षात ते महायुतीने दाखवलं आहे. अनेक प्रकल्प बनवण्यात महाराष्ट्र पुढे आहे. तंत्रज्ञानात निधी येतोय.
हीच आंबेडकरांना खरी श्रद्धांजली
काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना कोणाचीच पर्वा नाही. रिकाम्या पानांची संविधानाची प्रत घेऊन फिरतात. संविधानाची गोष्ट येते तेव्हा उलट्याच गोष्टी करतात. 75 वर्षात आंबेडकर यांचे संविधान जम्मू काश्मीरात लागू होऊ दिले नाही. काँग्रेस हे पाप होते. कलम 370 ची भिंत उभी केली होती. भाजपा एनडीएनं हे हटवलं आणि एक देश एक संविधान लागू केलं. माझी हीच आंबेडकरांना खरी श्रद्धांजली आहे. भारताचे संविधान जम्मू काश्मिरीत लागू झाले तेव्हा सर्व देश आनंदी झाला होता. तुम्हाला आनंद झाला. मात्र काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्यांच्या पोटात दुखायला लागले. दोन-तीन दिवस आधी काँग्रेस आणि साथीदारांनी 370 लागू करण्यासाठी गोंधळ घातला. जम्मू काश्मीरमध्ये आंबेडकरांचे संविधान हटवले जावे हे यांना पाहिजे. दलित, वाल्मिकी समाजाचे आरक्षण काढावं असं त्यांना वाटतंय, असेही नरेंद्र मोदी म्हणाले