आर्वीतून भाजप उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू 

कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव चिवडे पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून सुरुवात 

On
आर्वीतून भाजप उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू 

चिवडे पाटलांच्या हस्ते डॉ.चाकूरकरांच्या प्रचाराचा आर्वीत नारळ फुटला

लातूर / प्रतिनिधी :  राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाने सुद्धा कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ॲड.विजुभाऊ हरगुडे, प्रदेश सरचिटणीस हनुमंत लांडगे, भूषण पाटील,  मराठवाडा अध्यक्ष दादासाहेब ननवरे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता राज्यांमध्ये पुन्हा एकदा आणण्यासाठी कंबर कसली आहे. 

प्रत्येक जिल्हा निहाय प्रभारींची नेमणूक तालुका निहाय व मंडल निहाय नेमणुका करून कामगार मोर्चाने २०२४ विधानसभेच्या निवडणुकीत आघाडी घेतली असून त्याचा फायदा हा नक्कीच भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात होणार असून कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. विजुभाऊ हरगुडे यांनी केलेल्या सूक्ष्म अशा नियोजनामुळे भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाची ताकद या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

राज्यात एकच चर्चा; कामगार मोर्चा

कामगारांच्या अनेक योजनांचा लाभ हा थेट कामगारापर्यंत पोहोचवण्यासाठी कामगार मोर्चाने अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे सध्या राज्यांमध्ये एकच चर्चा कामगार मोर्चा अशी वल्गना केली जाते. कामगार मोर्चाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी या निवडणुकीत तन-मन-धनाने कामाला लागला असून महायुतीची सत्ता येईपर्यंत कामगार मोर्चाचा एकही पदाधिकारी आणि कार्यकर्ता शांत राहणार नाही असा ठाम विश्वासही यावेळी बोलताना कामगार मोर्चा प्रदेश सचिव ज्योतिराम चिवडे पाटील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला. 

image - 2024-11-11T205125.795

मराठा समाजाचे मत महायुतीलाच मिळणार 

महायुती सरकारच्या काळात अनेक जणू कल्याणकारी योजना राबवल्या असल्यामुळे राज्यांमधील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळेच सध्या महाविकास आघाडीचे धाबे दणाणले असून महायुतीचे सरकार हे राज्यांमध्ये येणार ही काळ्यादगडावरची पांढरी रेघ आहे असा ठाम विश्वासही प्रदेश सचिव ज्योतीराम चिवडे पाटील यांनी बोलून दाखवला आहे. यावेळी चिवडे पाटील यांनी मराठा समाज सुद्धा संपूर्ण ताकतीनिशी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे आश्वासन ही दिले आहे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढणार असून एकही मराठा समाजाचे मत महाविकास आघाडीला जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेणार असल्याचे विधानही यावेळी चिवडे पाटील यांनी केले आहे.

मविआच्या काळात  कामगारांना अन्याय 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात कामगारावरती खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झाला असून तो अन्य दूर करण्यासाठी आम्ही कामगार मोर्चा म्हणून प्रत्येक कामगारांच्या घराघरात पोहोचलो असून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न केल्याचेही यावेळी कामगार मोर्चा प्रदेश सचिव ज्योतिराम चिवडे पाटील यांनी ठणकावून सांगितले. इथून पुढे २५ वर्ष राज्यातच नव्हे तर देशांमध्ये सुद्धा महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही, असा संकल्पही ज्योतीराम चिवडे पाटील यांनी बोलून दाखवला. 

राज्यात महायुतीचे सरकार अन् मुख्यमंत्री फडणवीस होणार

या निवडणुकीत महायुतीच्या किमान १७० ते १८० जागा निवडून येणार व पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार असा ठाम विश्वासही, चिवडे पाटील यांनी बोलून दाखवला. यावेळी ज्योतीराम चिवडे पाटील यांच्यासह कामगार मोर्चा लातूर शहर जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास मेनकुदळे, राम भताने, अंकित व्यास, प्रमोद नरवाने, बसवेश्वर उभे, लहुजी झरकर, बापू पांचाळ, बिरदेव भुसाळे, तानाजी राजमाने, नवनाथ बेदरे, विलास रणखांब, प्रल्हाद क्षीरसागर, ज्योतीराम गाडे, ऋषिकेश चव्हाण, अक्षय शिंदे, महेंद्र चौभारकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .  

Advertisement

Latest News

राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
uresh Padvi join BJP : एकीकडे  विनोद तावडे यांनी  मतदारांना पैसे वाटले असा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. विरारमध्ये थरार...
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप 
कोणत्याही स्थितीत गद्दारांना गाडणार; सत्ताधाऱ्यांनी सरकारची तिजोरी लुटली; ठाकरेंची तोफ धडाडली
माझ्या जागेवर दुसरी आणली, हर्षवर्धन जाधवांवर आरोप करत संजना जाधव भर सभेत रडल्या