केवळ 99 रुपयांत पाहता येणार सोनू सूदचा चित्रपट 'फतेह' !
जबरदस्त अॅक्शन, उद्यापासून येणार थिएटरमध्ये, चाहत्यांमध्ये भरला संचार
बॉलीवूड अभिनेता सोनू सूद हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी खूप जास्त ओळखला जातो. सोनू सूद नेहमीच गरजवंत लोकांना भरभरून मदत करत असतो. तसेच त्याला 'गरिबांचा मसीहा' म्हटले जाते. तो गरजूंना मदत करण्यास नेहमीच तत्पर असतो.
अशातच त्याचाआगामी चित्रपट 'फतेह' चित्रपट हा प्रदर्शनासाठी तयार आहे. सिनेमागृहात सिनेमा पाहायला जाणे हे खर्चिकच असते. परंतु सोनू सूदने त्याच्या चाहत्यांसाठी खास सवलत दिली आहे. 'फतेह' चित्रपट प्रेक्षकांना केवळ 99 रुपयांमध्ये पाहता येणार आहे.
'फतेह' चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या तिकिटांची किंमत फक्त 99 रुपये असेल, अशी घोषणा सोनू सूदने केली आहे. सोनू सूदने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो म्हणतोय की, "2020 मध्ये, जेव्हा संपूर्ण कोविड सुरू झाला, तेव्हा हजारो आणि लाखो लोक मदतीसाठी माझ्याकडे येऊ इच्छित होते. त्यांच्यासोबत सायबर फसवणूक होऊ लागली. त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आले.
मला हे अजिबात आवडलं नाही. म्हणून मी विचार करत होतो की तुमच्यासाठी बनवलेला हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल आणि थिएटरमध्ये कसा प्रदर्शित होईल, 10 जानेवारी रोजी सिनेमा प्रदर्शित होत आहे. तर तुमच्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी 'फतेह'च्या तिकिटाची किंमत 99 रुपये असेल".
चित्रपटातून मिळणारा नफा धर्मादाय संस्थेला मिळणार
तसेच चित्रपटातून मिळणारा नफा हा धर्मादाय संस्थेला दान केला जाणार आहे. सोनूचे चाहते सोनूच्या या कृतीचे कौतुक करत आहेत. त्याचे अनेक चाहते त्याच्या या उपक्रमासोबत उभे राहण्यास तयार आहेत.
हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन असणार आहे. आतापर्यंत चित्रपटाचे दोन ट्रेलर रिलीज झाले आहेत आणि दोन्हीही धमाकेदार आहेत.
ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाला अॅक्शन आणि फायटिंगच्या बाबतीत कडक टक्कर देत असल्याचे दिसून येत आहे. ट्रेलर पाहून त्याच्या चाहत्यांची उत्सुकता खूप वाढली आहे.