विद्यार्थ्यांनो सावधान, परीक्षेत कॉपी कराल तर खबरदार! शिक्षण खात्याचा जबरदस्त निर्णय
सध्या परीक्षांचा हंगाम जवळ आला आहे. आणि ही बातमी आहे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी. बोर्डाच्या परीक्षेवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. त्यामुळे परीक्षेत जर कॉपी केली तर कोणाचीच खैर नाही. कारण परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्या सगळ्या हाचलाली आता कॅमेऱ्यात कैद होणार आहेत.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण खात्यानं नेमका काय निर्णय घेतलाय आणि त्याची कशी अंमलबजावणी होणार यावर एक नजर टाकूया.बोर्डाच्या परिक्षेत कितीही उपाय केले तरी सर्रास होणारे कॉपीचे प्रकार यंदा मात्र होणार नाही. कारण कॉपी मुक्त परिक्षा घेण्यासाठी यंदा शिक्षण विभागानं विशेष काळजी घेतलीये. आता १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षेवर थेट कॅमेऱ्याची नजर असणार आहे.
यंदाच्या वर्षी कोणते नियम अत्यंत कडक करण्यात आले ते पहा:-
1. 10, 12वी कॉपी बंद, व्हिडिओ सुरू
2. कॉपी रोखण्यासाठी सीसीटीव्हीसह व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार
3. परिक्षांचं फुटेज निकालापर्यंत जतन करुन ठेवणार
4. विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्थेत बदल केल्यास कारवाई होणार
5. पर्यवेक्षकांनी एकाच ठिकाणी उभं न राहता फिरत राहणं आवश्यक
6. शिक्षण विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करणार
आता थेट कारवाईचे आदेश
याआधी देखिल शिक्षण विभागानं दहावी बारावीच्या परिक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी उपाय योजना केल्या होत्या परंतू आता शिक्षण विभागानं आदेश काढत सोयी सुविधा आणि सीसीटिव्ही आहे की नाही याची पडताळणी करण्याचं ठरवलंय. त्यामुळे परिक्षेतील हे गैरप्रकार रोखले जातील असा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आलाय.
शिक्षण विभागानं यंदाच्या परिक्षेतील गैरप्रकारांना रोखण्यासाठी केलेली जय्यत तयारी नक्कीच स्तुत्य आहे. परंतू या निर्णंयाची राज्यात अंमलबजावणी कशी होणार आणि यामुळे कॉपी रोखण्यात किती यश येणार हे पाहणे योग्य ठरेल!