डॉक्टरांनी मृत घोषित केले, घरात अंत्यविधीची तयारी झाली सुरू, पण आजोबा जिंवत झाले
कोल्हापूर शहरातील घटना, नेमका काय घडला प्रकार, पाहा- व्हिडिओ अन् वाचा संपूर्ण स्टोरी
देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कोल्हापूरातील कसबा बावडा या भागात पाहायला मिळाला. एका आजोबांना हृदय विकाराचा झटका आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांच्या घरी अंत्यविधीची तयारी झाली. परंतु, रुग्णवाहिकेने घरी आणताना खड्ड्यांमुळे बसलेल्या दणक्याने आजोबा पुन्हा जिवंत झाले. आजपर्यंत अनेकांसाठी जीवघेणे ठरलेले रस्त्यावरील खड्डे आजोबांसाठी जीवदान देणारे ठरल्याचे बोलले जात आहे.
पांडुरंग उलपे असे या आजोबांचे नाव आहे. पांडुरंग तात्या हे वारकरी संप्रदायातील आहेत. सोळा डिसेंबर रोजी पांडुरंग उलपे हे सायंकाळी हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांची परिस्थिती पाहून घरच्यांनी त्यांना लगेच रुग्णालयात दाखल केले. रात्री साडे अकरापर्यंत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते. पण अखेर पांडुरंग यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पांडुरंग उलपे यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर जवळचे पाहुणे, नातेवाईक, गावकरी त्यांच्या घरी जमले. सर्वांनी पांडुरंग उलपे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली.
Dead Man Comes Alive | खड्ड्यांने प्राण 'वाचवले' तात्या जिवंत झाले! #kolhapurnews #oldman #alive #pothole #road #ambulance #death #funeral #lifesaved #breakingnews #latestnews #miracle #maharashtra pic.twitter.com/WvfJ8blUm6
— Shreshth Maharashtra (@shreshthamaha) January 2, 2025
पांडुरंगाच्या कृपेने पुन्हा पांडुरंग उलपे पुन्हा पायी चालत आले
रुग्णालयातून पांडुरंग उलपे यांचे पार्थिव अँम्ब्युलन्सने नेत असताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे अँब्युलन्सला चांगलाच दणका बसला. या दणक्यानंतर त्यांची हालचाल होत असल्याचे रुग्णवाहिकेतील नातेवाईकांच्या लक्षात आले.
डॉक्टरांनी मृत घोषित केलेले पांडुरंग उलपे पुन्हा जिवंत झाले होते. यानंतर नातेवाइकांनी त्यांना पुन्हा रुग्णालयात नेले. तेथे तात्यांवर पुन्हा उपचार करण्यात आले. त्यांच्या शरीरानेही उपचारांना प्रतिसाद दिला. उपचारानंतर पांडुरंग उलपे आपल्या पायावर उभे राहून घराकडे चालत आले. सोमवारी त्यांना रूग्णालयातून घरी सोडले.
मृत्युच्या दारातून परत आलेल्या पांडुरंग उलपे यांचे कुटुंबीयांनी जोरदार स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी फुले अंथरण्यात आली होती. नातेवाईकांनी पांडुरंगाचे आभार मानत, ही सर्व त्याचीच कृपा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.