ऑस्कर-2025 च्या यादीत 'हे' 5 भारतीय सिनेमे दाखल, वाचा संपूर्ण यादी!
Oscar 2025 nominations for 5 Indian films : 'ऑस्कर' हा चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा असा पुरस्कार समजला जातो . यावर्षीच्या अकादमी पुरस्कारांची घोषणा लवकरच होणार आहे. आणि त्यापूर्वी भारतातील कोणत्या चित्रपटांना ऑस्करमध्ये नामांकन मिळाले हे आपण जाणून घेऊ .
नामांकनाची यादी नुकतीच समोर आली आहे. चला बघूया कोणते चित्रपट आहेत.
जगभरातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या सोहळ्यासाठी अनेक भारतीय चित्रपटांना देखील नामांकन मिळाले आहे. गेल्या वर्षी 'लापता लेडीज' चे नाव ऑस्कर पुरस्काराच्या नॉमिनेशनसाठी समोर आले होते. मात्र हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अशातच आता या वर्षी काही चित्रपटांची नावं समोर आली आहेत. ज्यामध्ये हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांचा सहभाग असलेला दिसून येत आहे.
आता ९७ व्या ऑस्कर सोहळ्यासाठी दाक्षिणात्य सुपरस्टारचा एक बहूचर्चित चित्रपटाचे नाव येऊ शकते अशी चर्चा सुरु आहे.दाक्षिणात्य चित्रपटाच्या ट्रेड अनालिस्ट मनोबाला विजयबालन यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर 'कंगुवा'च्या ऑस्कर एंट्रीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये अकादमी पुरस्काराची एक सूची जारी केली आहे. यामध्ये 'कंगुवा'चा देखील समावेश आहे. सर्वोकृष्ट फीचर फिल्म कॅटेगरीमध्ये 'कंगुवा'चा समावेश आहे.
यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा इथे पार पडणार:-
यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे ९७ वे वर्ष आहे. हा पुरस्कार सोहळा २ मार्च २०२५ रोजी लॉस एंजलिस मध्ये आयोजित केला आहे. यावेळी ऑस्करसाठी अनेक भाषांमधील चित्रपटांना नामांकन मिळाले आहे. त्यामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याचा चित्रपट 'कंगुवा'चे नाव समोर येत आहे. तसेच या व्यतिरिक्त अजून पाच चित्रपटांचाही समावेश दिसून येत आहे.
नामांकन असलेले ते पाच चित्रपट कोणते ते पाहूया
ऑस्कर २०२५ मध्ये 'कंगुवा'सोबतच 'द गोट लाईफ', 'स्वातंत्र्य वीर सावरकर', 'ऑल वी इमॅजीन इज लाइट', 'गर्ल्स विल बी गर्ल्स' व 'अनुजा' या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी 'लापता लेडीज' या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड करण्यात आली होती. पण हा बॉलीवूड मधील सिनेमा ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर पडला आहे.