महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' लवकरच चित्रपटगृहांत!
Phule film will be released in theaters soon : स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणारे आणि त्यांना समाजात योग्य ते वागणूक मिळावी अशी तळमळ असणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित सिनेमाची मागच्या वर्षी घोषणा करण्यात आली होती. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त गेल्यावर्षी त्यांच्यावर आधारित हिंदी सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. त्यांच्या बायोपिकचं नाव 'फुले'असं आहे.सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त 'फुले' सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात महात्मा फुले यांच्या जयंतीला 'फुले' या हिंदी सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमात प्रतिक गांधी महात्मा फुले तर अभिनेत्री पत्रलेखा सावित्रीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून 'फुले' हा सिनेमा येत्या ११ एप्रिलला प्रदर्शित करण्यात येणार आहे. महात्मा फुलेंच्या जयंतीच्या दिवशी हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे.
Sakhi
झी स्टुडियोची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या सिनेमाचं काम सुरू आहे. अखेर यावर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा यांचे चाहते त्यांना महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत बघण्यास उत्सुक आहेत.