राष्ट्राच्या नवनिर्माणासाठी छत्रपती शिवराय, डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंदांच्या विचारांची गरज : शालिनी वर्मा

अभाविपच्या शोभायात्रेने लक्ष वेधले

On
राष्ट्राच्या नवनिर्माणासाठी छत्रपती शिवराय, डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंदांच्या विचारांची गरज : शालिनी वर्मा

लातूर/प्रतिनिधी: स्वातंत्र्यानंतर भारताला अमेरिका व जपानचे मॉडेल बनवू, अशा घोषणा देण्यात आल्या.नेहरू मॉडेल हवे असल्याचे सांगण्यात आले. त्याच काळात स्थापन झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राष्ट्राच्या नवनिर्माणासाठी अमेरिका व जपान नव्हे तर छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वामी विवेकानंदांचे विचार आवश्यक असल्याची भूमिका मांडली. याच भूमिकेतून 75 वर्षानंतर आजही विद्यार्थी परिषद कार्यरत असल्याचे प्रतिपादन अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री शालिनी वर्मा यांनी केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रांताचे 59 वे प्रदेश अधिवेशन लातूर येथे सुरू आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दिवाणजी मंगल कार्यालयापासून हनुमान चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेच्या समारोपप्रसंगी आयोजित जाहीर सभेत शालिनी वर्मा बोलत होत्या. मंचावर प्रदेश अध्यक्ष प्रा.डॉ.सचिन कंदले,प्रदेश मंत्री वैभवी ढिवरे यांच्यासह छात्र नेते साक्षी पाटील, चिन्मय महाले,
स्वप्निल बगाडे,अजिंक्य जहागीरदार, दर्शन पाटील यांची उपस्थिती होती.

WhatsApp Image 2025-01-03 at 8.52.48 PM

यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय मंत्री शालिनी वर्मा म्हणाल्या की, आज महाराष्ट्रात विद्यापीठामध्ये गोंधळाची स्थिती आहे. परंतु डोळ्यावर काळी पट्टी बांधलेल्या सरकारला ती दिसत नाही. महिला व मुलीवर हत्याचार होत आहेत. त्यावर कारवाई केली जात नाही. सरकारला आज सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची गरज आहे.सरकारने ही परिस्थिती सुधारली नाही तर विद्यार्थी परिषद सत्तापालट करू शकते,असे त्या म्हणाल्या.

WhatsApp Image 2025-01-03 at 8.52.49 PM

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेला 75 वर्षे झाली. स्वातंत्र्यानंतर देशाच्या नवनिर्माणासाठी अमेरिका, जपान मॉडेल तसेच नेहरू मॉडेलची आवश्यकता असल्याचे मत मांडले जात होते. त्या काळात अभाविपने भारतीय संस्कृती ही पुरातन असल्याचे सांगत छत्रपती शिवराय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद यांचे विचार महत्त्वाचे असल्याचे सांगत हा विचार लावून धरला.आजतागायत राष्ट्राच्या नवनिर्माणासाठी अभाविप हा विचार मांडत आली आहे.देशासाठी काम करण्याची प्रेरणा विद्यार्थी परिषदे कडून दिली जाते. आज देशात संविधानावरील बेगडी प्रेम दाखविणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परंतु बांगलादेशात हिंदू आणि दलितावर अत्याचार होत असताना ही मंडळी शांतच आहे. सामाजिक सलोखा जपत समरसतेच्या माध्यमातून सेवा करण्याचे काम परिषदेच्या माध्यमातून अखंड सुरू असल्याचे त्या म्हणाल्या.

Sakhi

प्रदेश मंत्री वैभवी ढिवरे म्हणाल्या की,विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचे काम सरकार करत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नाहीत. विविध परीक्षांचे पेपर फोडले जात आहेत. विद्यापीठांमध्ये गोंधळ आहे. यामुळे विद्यार्थी विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.विद्यार्थिनींनी घराबाहेर पडावे की नाही?अशी अवस्था निर्माण झाली आहे. मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय अद्यापही अमलात आलेला नाही. मराठवाड्यासारखी संतांची भूमी संवेदनशील बनली असून सामाजिक सलोखा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. लातूरच्या संघर्षाच्या भूमीतून विचारांची धगधगती ऊर्जा आपण घेऊन जाणार असल्याचेही वैभवी ढिवरे म्हणाल्या.

WhatsApp Image 2025-01-03 at 8.52.49 PM (1)

तत्पूर्वी साक्षी पाटील, चिन्मय महाले, स्वप्निल बगाडे,अजिंक्य जहागीरदार,दर्शन पाटील यांनी शिक्षण, आरोग्य,उद्योजकता या विषयावर मनोगत व्यक्त केले. या सभेस अधिवेशनासाठी उपस्थित देवगिरी प्रदेशातील सर्व विद्यार्थी प्रतिनिधी,स्वागत समितीचे सदस्य आणि शहरातील विद्यार्थ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शोभायात्रेने वेधले लक्ष....

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दिवाणजी मंगल कार्यालयातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेने लातूरकरांचे लक्ष वेधले.दिवाणजी मंगल कार्यापासून खोरी गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज, चौक मेन रोड मार्गे लोकमान्य टिळक चौक, गांधी चौक, बस स्थानक या मार्गे ही यात्रा हनुमान चौकात पोहोचली. तेथे या यात्रेचे जाहीर सभेमध्ये रूपांतर झाले.सजवलेले घोडे व उंट तसेच पारंपारिक वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांचा शोभायात्रेत सहभाग होता.ध्वनिक्षेपक लावलेली वाहने, विद्यार्थ्यांच्या जोषपूर्ण घोषणा आणि विविध घोषवाक्य लिहिलेले फलक हातात घेतलेले विद्यार्थी शोभायात्रेत सहभागी झाले होते.ठिकठिकाणी या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. वाद्यांच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत निघालेल्या या  पदयात्रेवर विविध ठिकाणी पुष्पवृष्टी  करण्यात आली. 

Tags:

Advertisement

Latest News

महाकुंभ मेळा- 2025 मध्ये सहभागी होणार लॉरेन पॉवेल-जॉब्स ! महाकुंभ मेळा- 2025 मध्ये सहभागी होणार लॉरेन पॉवेल-जॉब्स !
MahaKumbh Mela-2025 : येत्या 13 जानेवारीपासून उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे पवित्र महाकुंभाला सुरुवात होत आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती...
केवळ 99 रुपयांत पाहता येणार सोनू सूदचा चित्रपट 'फतेह' !
चहाचे कागदी कप आता होणार हद्दपार! आरोग्यास घातक असल्याने घेतला निर्णय!
HMPV विषाणूचा 9वा रुग्ण:मुंबईत 6 महिन्यांच्या मुलीला झाली लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
'हा' आयुर्वेदिक चहा ठेवेल आपल्याला अनेक आजारांपासून दूर!
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी श्री. घृष्णेश्वराच्या भक्तीत लीन!
ऑस्कर-2025 च्या यादीत 'हे' 5 भारतीय सिनेमे दाखल, वाचा संपूर्ण यादी!