जमिनीची तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर पोलिस ठाण्यातच लैंगिक अत्याचार, VIDEO
रक्षकच निघाला भक्षक; DYSP निलंबित, व्हायरल व्हिडिओनंतर सर्वत्र संताप व्यक्त, कुठे घडला धक्कादायक प्रकार
Karnataka Police Officer Suspended : जमिनीच्या वादाची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या महिलेसोबत वरिष्ठ पोलिस अधिका-यांने लैगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कर्नाटकमधील मधुगिरी उपविभाग या ठिकाणी घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे रक्षकच महिलेच्या सुरक्षेबाबत भक्षक झाले अशी भावना व्यक्त केली जात आहे. तर सदर गैरवर्तन करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
आरोपी पोलिस अधिकाऱ्याचे नाव रामचंद्रप्पा (वय 58 वर्षीय) आहे. पिडीत महिलेने आरोप केला आहे की, वरिष्ठ पोलिस अधिका-याने आपल्या कार्यालयातील शौचालयात नेले आणि तिच्यावर लैंगिक कृत्य केले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी महिलेसोबत गैरवर्तन करताना दिसत आहे.
A woman went to the office of Madhugiri DYSP Ramachandrappa in Pavagada under @SPTumkur of Karnataka to file a complaint regarding a land dispute. The Dy SP allegedly took her to his restroom inside the office and engaged in sexual act with her on the pretext of doing favour to… pic.twitter.com/QAEC5dIjrN
— NCMIndia Council For Men Affairs (@NCMIndiaa) January 3, 2025
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार जमीन वादाची तक्रार देण्यासाठी महिला पोलिस अधिकारी रामचंद्रप्पा यांच्या कार्यालयात गेली असता त्यावेळी ही घटना घडली आहे. महिलेने आरोप केला आहे की, त्याने तिला एका ऑफिस रूममध्ये नेले आणि तिच्याशी गैरवर्तन केले, तसेच अयोग्यरित्या स्पर्श केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Sakhi
कडक कारवाई करणार
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी अधिकाऱ्याची चौकशी सुरू केली आहे. आरोपी अधिकाऱ्याचे नाव रामचंद्रप्पा (58) असे असून ते मधुगिरीमध्ये डेप्युटी एसपी (डीवायएसपी) म्हणून तैनात होते. पोलिसांनी त्याला अटक केली असून याप्रकरणी आरोपी अधिकाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचं पोलिस अधिका-यांनी सांगितले.