अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस!
Akshay Kumar New Movie : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार नवीन वर्षामध्ये आता त्याचे धमाकेदार चित्रपट घेऊन येत आहे . त्याच्या 'स्काय फोर्स' या नवीन वर्षामधील पहिल्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धादरम्यान भारताने पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर केलेल्या हवाई हल्ल्यावर हा सिनेमा आधारित आहे.नुकतंच या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. आता 'स्काय फोर्स' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
'स्काय फोर्स' सिनेमात अक्षय कुमार भारताच्या हवाई दलातील अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'स्काय फोर्स' सिनेमाचा ट्रेलर खिळवून ठेवणारा आहे. या सिनेमात अक्षयसोबत वीर पहारियादेखील मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताचे अनेक जवान शहीद झाल्याचं दिसत आहे. त्यानंतर भारताच्या हवाई दलाकडून पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केलं जातं. पण, या मिशनमध्ये एक सैनिक हरवत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. 'स्काय फोर्स' सिनेमातून प्रेक्षकांना एक रोमांचकारी कथा बघायला मिळणार आहे.स्काय फोर्स' सिनेमात अक्षय कुमार आणि वीर पहारियासोबत सारा अली खान, निम्रत कौर आणि शरद केळकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर 'स्काय फोर्स' सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. २४ जानेवारीला 'स्काय फोर्स' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशभक्तीवर आधारित हा सिनेमा सर्वांनीच पाहण्यासारखा आहे .