खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक; भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप

माहिती खोटी निघाली तर राजकारण सोडण्याचेही चॅलेंज; अजित पवारांना केली मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

On
खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक; भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप

Suresh Dhas Attack On : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना अटक करून कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी पुणे शहरात सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चावेळी केलेल्या भाषणात भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

भाजप आमदार सुरेश धस म्हणाले की, पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर बैठक झाली होती आणि नंतर निवडणुकीसाठी या कंपनीकडून 50 लाख रुपये घेण्यात आले, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.

धनंजय मुंडेंवर आरोप करताना तारखांचा उल्लेख करत सुरेश धस म्हणाले की, 14 जून रोजी अवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मीक कराड, नितीन बिक्कड यांची मुंडेंच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली.

या बैठकीनंतर थेट धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी अवादा कंपनीच्या शुक्ला नावाचा अधिकारी मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्याकडे प्रयत्न करत होते.  मला डावलून थेट धनंजय मुंडेंची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याने ही बाब वाल्मीक कराडला खटकली.

त्यामुळे वाल्मीकने जोशीला खडसावलं आणि त्यानंतर 19 जून रोजी अवादा कंपनी आणि आय एनर्जी या कंपनीच्या अधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना ही बाब फोनवर सांगितली.

Sakhi

वरिष्ठांनी तीन कोटींऐवजी दोन कोटी रुपये देण्यास सहमत दाखवली. त्यानंतर निवडणुकीसाठी आता लगेच 50 लाख रुपये द्या, अशी मागणी कंपनीकडे करण्यात आली आणि कंपनीने यांना 50 लाख रुपये दिले. हे पैसे तेव्हा धनंजय मुंडेंनी घेतले की वाल्मीक कराड याने हे मला माहीत नाही. धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर खंडणीसाठी बैठका झाल्या," असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे. 

"...तर मी राजकारण सोडतो"...

अजितदादा मी तुमच्या पाया पडतो, तुमचं काय अडकलंय धनंजय मुंडेंकडे? त्यांना जाऊ द्या मंत्रिमंडळातून बाहेर. ते सातपुडा या सरकारी बंगल्यावर खंडणीसाठी बैठका घेत आहेत. ही माहिती खोटी निघाली तर मी राजकारण सोडेन. माझ्याकडे आता 300 गायींचा गोठा आहे, राजकारण सोडून तो 1000 गायींचा गोठा करेन.

माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना विनंती आहे की, या गोष्टीचा छडा लावा आणि प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढा," असं आवाहनही सुरेश धस यांनी केलं आहे. 

 

Tags:

Advertisement

Latest News

महाकुंभ मेळा- 2025 मध्ये सहभागी होणार लॉरेन पॉवेल-जॉब्स ! महाकुंभ मेळा- 2025 मध्ये सहभागी होणार लॉरेन पॉवेल-जॉब्स !
MahaKumbh Mela-2025 : येत्या 13 जानेवारीपासून उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे पवित्र महाकुंभाला सुरुवात होत आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती...
केवळ 99 रुपयांत पाहता येणार सोनू सूदचा चित्रपट 'फतेह' !
चहाचे कागदी कप आता होणार हद्दपार! आरोग्यास घातक असल्याने घेतला निर्णय!
HMPV विषाणूचा 9वा रुग्ण:मुंबईत 6 महिन्यांच्या मुलीला झाली लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
'हा' आयुर्वेदिक चहा ठेवेल आपल्याला अनेक आजारांपासून दूर!
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी श्री. घृष्णेश्वराच्या भक्तीत लीन!
ऑस्कर-2025 च्या यादीत 'हे' 5 भारतीय सिनेमे दाखल, वाचा संपूर्ण यादी!