राधाकृष्ण विखे पाटलांची खोटक टीका; म्हणाले- शरद पवार, सुप्रिया सुळेंनी आता घरी बसावे

त्यांच्या वांग्याला चांगला भाव मिळेल, त्यामुळे शेती करण्याचाही दिला उपरोधिक टोला

On
राधाकृष्ण विखे पाटलांची खोटक टीका; म्हणाले- शरद पवार, सुप्रिया सुळेंनी आता घरी बसावे

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली आहे. शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी आता आपल्या घरी बसावे. स्वतःची शेतीबाडी पहावी. कारण, आता त्यांच्या वांग्याला चांगलेच पैसे मिळालेत, असे ते म्हणालेत.

सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सद्यस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटेच सक्रीय असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या टीकेचा समाचार घेताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्यासह शरद पवारांना घरी बसून शेती करण्याचा उपरोधिक सल्ला दिला.

ते म्हणाले, जनतेने त्यांना नाकारले आहे. जनाधार नसलेल्या नेत्यांनी आता घरी बसावे. शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी घरी बसावे. स्वतःची शेतीबाडी पहावी. त्यांच्या वांग्याला आता चांगलेच पैसे मिळालेत. सुप्रिया सुळे यांनी आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वांग्याच्या शेतीविषयी मार्गदर्शन करावे. कारण वांग्याचे, बटाट्याचे पैसे एवढेच त्यांचे काम आहे.

तत्पूर्वी, विखे पाटलांनी बीडच्या मस्साजोग प्रकरणी अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले होते. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विचार केला जाईल, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी महायुतीत एकच खळबळ माजली होती. विशेषतः धनंजय मुंडे यांच्या डोक्यावर राजीनाम्याची टांगती तलवार असल्याचेही यामुळे स्पष्ट झाले होते.

Sakhi

आता पाहू काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे महायुती सरकारवर निशाणा साधताना म्हणाल्या होत्या की, राज्यात महायुती सरकार स्थापन होऊन महिना होत आहे. मंत्र्यांना खातेवाटपही झाले. पण अद्याप अनेक मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला नाही. राज्य मंत्रिमंडळाची काल पहिली बैठकही झाली. त्यात 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पण राज्य सरकारमधील मंत्री नावालाच असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटेच सरकार चालवतात. 

Tags:

Advertisement

Latest News

महाकुंभ मेळा- 2025 मध्ये सहभागी होणार लॉरेन पॉवेल-जॉब्स ! महाकुंभ मेळा- 2025 मध्ये सहभागी होणार लॉरेन पॉवेल-जॉब्स !
MahaKumbh Mela-2025 : येत्या 13 जानेवारीपासून उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे पवित्र महाकुंभाला सुरुवात होत आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती...
केवळ 99 रुपयांत पाहता येणार सोनू सूदचा चित्रपट 'फतेह' !
चहाचे कागदी कप आता होणार हद्दपार! आरोग्यास घातक असल्याने घेतला निर्णय!
HMPV विषाणूचा 9वा रुग्ण:मुंबईत 6 महिन्यांच्या मुलीला झाली लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
'हा' आयुर्वेदिक चहा ठेवेल आपल्याला अनेक आजारांपासून दूर!
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी श्री. घृष्णेश्वराच्या भक्तीत लीन!
ऑस्कर-2025 च्या यादीत 'हे' 5 भारतीय सिनेमे दाखल, वाचा संपूर्ण यादी!