Shocking..! चीनमधील विषाणू भारतात दाखल; देशभरात आढळले तीन रुग्ण
काय आहे HMPV Virus?, कर्नाटकात 8 व 3 महिन्यांची बालके संक्रमित, गुजरातेत 2 महिन्यांच्या बाळाला लागण
HMPV Virus : चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या HMPV व्हायरसने आता भारतात देखील शिरकाव केला असून महाराष्ट्राचं शेजारी राज्य असलेल्या कर्नाटकात दोन रुग्ण आढळले आहेत.एक वर्षही पूर्ण न झालेल्या दोन लहान मुलांना HMPV ची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
बंगळुरुच्या एका 8 महिन्यांच्या मुलाला तसंच 3 महिन्यांच्या एका मुलीला HMPV चा व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या मुलांनी कुठेही प्रवास केला नव्हता, मात्र तरीही त्यांना या व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे.
चीनमध्ये पसरलेल्या HMPV या कोरोना सदृश विषाणूचा तिसरा रुग्ण भारतात आढळून आला आहे. अहमदाबादमध्ये एका 2 महिन्यांच्या बाळाला ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) ची लागण झाल्याचे आढळून आले. तत्पूर्वी, सोमवारीच कर्नाटकात 3 महिन्यांची मुलगी आणि 8 महिन्यांच्या मुलामध्ये हाच विषाणू आढळला होता.
तज्ञांचे काय मत आहे बघा:-
सध्या चीनमध्ये HMPV व्हायरस धुमाकूळ घालत असून भारतात देखील याचे दोन रूग्ण सापडल्याची माहिती आहे. त्यामुळे या देशातील नागरिकांमध्ये या व्हायरसबाबत भीती निर्माण झाली आहे. दरम्यान,पुण्यातील डॉ. अविनाश भोंडवे यांनी याबाबत आता माहिती दिलीये. HMPV विषाणू घातक नाही, सर्दी खोकल्यासारखा श्वसन संस्थेचा आजार आहे, असं त्यांनी म्हटलंय.डॉ. भोंडवे यांच्या म्हणण्यानुसार, नाक गळणं,घसा दुखणं ही त्याची लक्षणं असली तरीही हा व्हायरस कोरोना सारखा आजार नाही. हा व्हायरस वेगाने पसरत आहे. मात्र लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना धोका आहे. 2001 पासून व्हायरसची माहिती आहे. त्यामुळे घाबरायचं कारण नाही.
Sakhi
सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. दरम्यान खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत . सर्वच मार्गदर्शक तत्वांचे पालन अवश्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.