20 दिवसांवर घरात धाकट्या मुलाचे लग्न, तत्पूर्वीच आई वडिलांनी केली आत्महत्या; नाशिक हादरलं!

On
20 दिवसांवर घरात धाकट्या मुलाचे लग्न, तत्पूर्वीच आई वडिलांनी केली आत्महत्या; नाशिक हादरलं!

Nashik News : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे.  घरात मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई-वडिलांनी जहर सेवन करून आत्महत्या केली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील टिळकवाडी परिसरात शहा कुटुंब वास्तव्यास आहे. शहा कुटुंबातील धाकट्या मुलाचा लग्न सोहळा अवघ्या 20 दिवसांवर आल्याने जोरदार तयारी सुरु होती. मात्र, त्यातच शाह दाम्पत्याने विष सेवन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे.   

मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...

आपल्या मुलासोबत सोमवारी रात्री शाह दाम्पत्याने जेवण केले. यानंतर पती आणि पत्नीने आपल्या खोलीत जाऊन विष सेवन केले. मुलाच्या लग्नाची तयारी घरात सुरू असताना आई-वडिलांनी आत्महत्या केल्याने शहा कुटुंबास मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

वीस दिवसांवर होते धाकट्या मुलाचे लग्न

अवघ्या वीस दिवसांवर धाकट्या मुलाचा लग्न सोहळा असतानाच आई-वडिलांनी आत्महत्या केल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच महिलेने केली आत्महत्या

दरम्यान, रविवारी नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एक महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. रुग्णालयाच्या आवारातील झाडाला गळफास घेत महिलेने स्वतःचे आयुष्य संपवलं.  कविता अहीवळे असे महिलेचे नाव आहे. महिलेने गळफास घेतल्यानंतर रुग्णालयाच्या आवारात एकच खळबळ उडाली होती.   

Tags:

Advertisement

Latest News

महाकुंभ मेळा- 2025 मध्ये सहभागी होणार लॉरेन पॉवेल-जॉब्स ! महाकुंभ मेळा- 2025 मध्ये सहभागी होणार लॉरेन पॉवेल-जॉब्स !
MahaKumbh Mela-2025 : येत्या 13 जानेवारीपासून उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे पवित्र महाकुंभाला सुरुवात होत आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती...
केवळ 99 रुपयांत पाहता येणार सोनू सूदचा चित्रपट 'फतेह' !
चहाचे कागदी कप आता होणार हद्दपार! आरोग्यास घातक असल्याने घेतला निर्णय!
HMPV विषाणूचा 9वा रुग्ण:मुंबईत 6 महिन्यांच्या मुलीला झाली लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
'हा' आयुर्वेदिक चहा ठेवेल आपल्याला अनेक आजारांपासून दूर!
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी श्री. घृष्णेश्वराच्या भक्तीत लीन!
ऑस्कर-2025 च्या यादीत 'हे' 5 भारतीय सिनेमे दाखल, वाचा संपूर्ण यादी!