अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवतोय, सगळे भिकारी येते जमा..; सुजय विखेंचं धक्कादायक विधान

शिर्डी परिक्रमा उपक्रम नियोजन संपन्न; म्हणाले- शिर्डीसह पंचक्रोशीतील मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करा

On
अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवतोय, सगळे भिकारी येते जमा..; सुजय विखेंचं धक्कादायक विधान

अहमदनगर :  शिर्डी संस्थानाकडून प्रसादालयात मोफत जेवण दिले जाते. तिथे 25 रुपये आकारणी करा. त्यातून मिळणारा पैसा शिर्डीतील मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा. अख्खा देश येऊन शिर्डीत फुकट जेवतोय, महाराष्ट्रातले सगळे भिकारी इथं गोळा झालेत असं धक्कादायक विधान भाजपा नेते माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे.  शिर्डी परिक्रमा उपक्रमाच्या नियोजनासाठी आयोजित कार्यक्रमात सुजय विखे पाटील बोलत होते.

उत्तम शिक्षकासाठी चांगला पगार द्या, त्याला आमचे समर्थन

यावेळी सुजय विखे म्हणाले की, शिर्डी संस्थानाने याचा विचार केला पाहिजे आपण काय करत आहोत, कशासाठी करत आहोत? शिर्डी संस्थानाने बांधलेल्या शिक्षण संकुलात दर्जेदार शिक्षक का देऊ शकत नाही? उत्तम शिक्षक आले पाहिजे. पगारावर खर्च होऊ द्या पण 12 वी पास झालेल्या मुलाला उत्कृष्ट इंग्लिश बोलता आलं पाहिजे अशी शिक्षण सुविधा दिली पाहिजे अन्यथा काही उपयोग नाही.

इमारतीवर खर्च नको, मुलांच्या भविष्यावर खर्च करा

सुजय विखे म्हणाले की, इमारतीवर, सभागृहावर खर्च केले जातात. शिकवणारा दीड लाख मागतोय तर त्याला द्या आणि गुणवत्तेवर शिक्षण द्या. तुम्ही बिनधास्त निर्णय घ्या कुणी काही करत नाही. कुणी आंदोलन केले तर त्याला सोबत घेऊ असंही त्यांनी सांगितले. 

सुजय विखे पुढे बोलताना म्हणाले की, आमच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न असेल तेव्हा शिर्डीतील कुठल्याही पक्षाचा माणूस तुम्हाला विरोध करणार नाही. सीबीएसईचं शिक्षण शिर्डीतील मुलांमुलींना मोफत झाले पाहिजे. माणूस शिकला तर तो योग्य मतदार होऊ शकेल.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक लावू. त्यात शिर्डीचा विकास यावर चर्चा करू. संस्थानाचा पैसा शिर्डीच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे. शिक्षण समृद्ध करा. इंग्लिश शिकवणाऱ्याला इंग्रजी येत नाही. तो मराठीत इंग्रजी शिकवतो. हे योग्य नाही. प्रसादालयात मोफत जेवण बंद करावं अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी केली.

दरम्यान, प्रसादालयात येणारा कुणीही गरीब नाही. 10 रुपयेचं जेवण प्रत्येकजण खाऊ शकतो. जे पैसे अन्नदानात खर्च होतात तो पैसा आमच्या मुलामुलींच्या भविष्यासाठी खर्च करा हीच आमची मागणी आहे. शिर्डीच्या अर्थकारणाला चालना मिळाली पाहिजे. संस्थानाचा पैसा खर्च होतोय, त्याची परतफेड या भूमीत जन्मलेल्या माणसाच्या उपजीविकेचे साधन व्हावे हे आपल्याला करायचे आहे.

हॉस्पिटलमध्ये स्थानिक केवळ 25 टक्के लोक

शिर्डीत संस्थानाकडून हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय झाला. बांधू शकता पण ही शिर्डीकरांची गरज नाही. शिक्षण संकुल जसं बांधले तसे कोचिंग सेंटर उभारून आपला मुलगा स्पर्धा परिक्षेत पास झाला पाहिजे. फक्त आणि फक्त शिर्डी आणि पंचक्रोशीतील मुलांसाठी हे उघडले पाहिजे. आपण दवाखाना उघडला तिथे २५ टक्केच स्थानिक लाभ घेतात, बाकी ७५ टक्के बाहेरचे आहेत असंही सुजय विखे पाटील यांनी सांगितले. 

Tags:

Advertisement

Latest News

महाकुंभ मेळा- 2025 मध्ये सहभागी होणार लॉरेन पॉवेल-जॉब्स ! महाकुंभ मेळा- 2025 मध्ये सहभागी होणार लॉरेन पॉवेल-जॉब्स !
MahaKumbh Mela-2025 : येत्या 13 जानेवारीपासून उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे पवित्र महाकुंभाला सुरुवात होत आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती...
केवळ 99 रुपयांत पाहता येणार सोनू सूदचा चित्रपट 'फतेह' !
चहाचे कागदी कप आता होणार हद्दपार! आरोग्यास घातक असल्याने घेतला निर्णय!
HMPV विषाणूचा 9वा रुग्ण:मुंबईत 6 महिन्यांच्या मुलीला झाली लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
'हा' आयुर्वेदिक चहा ठेवेल आपल्याला अनेक आजारांपासून दूर!
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी श्री. घृष्णेश्वराच्या भक्तीत लीन!
ऑस्कर-2025 च्या यादीत 'हे' 5 भारतीय सिनेमे दाखल, वाचा संपूर्ण यादी!